पुणे : सदाशिव पेठेत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एकास गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून पाच लाख १९ हजारांचे चरस, तलवार, कुऱ्हाड, चाकू अशी तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली. सागर सुभाष मोडक (वय ४३, रा. ऑर्चिड बिल्डींग, नातूबाग, १३६७, सदाशिव पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

सदाशिव पेठेतील नातूबाग परिसरात एक जण चरसची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस कर्मचारी अनिकेत बाबर यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मोडकला पकडले. पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे असल्याचे उघडकीस आले. मोडक याच्याकडून पाच लाख १९ हजार रुपयांचे ३५२ ग्रॅम चरस, तीन तलवारी, दोन कुकरी, एक सत्तूर, एक कुऱ्हाड, एक रापी असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे

हेही वाचा – पुण्यातील टिंबर मार्केटमधील जळीतग्रस्तांना लवकरात लवकर मदतीसाठी प्रशासनाला निर्देश दिले – अजित पवार

मोडकच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, अजय जाधव, अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, विठ्ठल साळुंके, तुषार माळवदकर, रुक्साना नदाफ आदींनी ही कारवाई केली.