दत्ता जाधव

गोवंश हत्याबंदी कायद्यासह विविध उपाययोजना करूनही देशभरात देशी गोवंशाची संख्या वेगाने कमी होत आहे. मात्र, अजूनही सलगरे (ता. मिरज) हे असे एक गाव आहे, जिथे पन्नास ते साठ देशी खिल्लार गायींचे दहा ते बारा कळप पाहावयास मिळतात. जातीवंत देशी खिल्लार गोवंशाच्या पैदासीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकात सलगरे गाव प्रसिद्ध आहे.महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील सलगरे गावाच्या माळरानावर, गायरानात पन्नास ते साठ गायी, बैल, वासरांचे कळप चरताना दिसतात. सुमारे दहा वर्षांपूर्वी गावात शंभरहून अधिक कळप होते. आता केवळ दहा ते बारा कळप राहिले आहेत.

milk adulterants, Maharashtra , milk samples, milk,
राज्यभरातून एका दिवसांत ११०० दुधाचे नमुने जप्त, अन्न आणि औषध प्रशासन दूध भेसळखोरांविरोधात आक्रमक
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…
Which animals are banned in India
भारतात ‘हे’ २० प्राणी पाळण्यावर बंदी; घरात आढळल्यास होऊ शकते कारवाई
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
Maharashtra Two Tiger Death, Tiger Death, pench ,
राज्यात एकाच दिवशी दोन वाघांचा मृत्यू
Tiger dies after being hit by unknown vehicle in vardha
वाघाचा अपघातात मृत्यू, आईपासून दुरावला अन्…
Tigers remain free even after month animal poaching continues
बार्शीतील वाघाचे भय संपेना! महिन्यानंतरही वाघ मोकाट, जनावरांची शिकार सुरूच

हेही वाचा >>>पुणे : एमपीएससीच्या कक्षेतील सरळसेवा पदांचे मागणीपत्र विनाविलंब पाठवा ; सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश

स्थानिक शेतकरी देशी खिल्लार गोवंशाची पैदास करून आपली उपजीविका चालवितात. आपण बहुतेकांनी शेळ्या-मेंढ्यांचे कळप पाहिले आहेत. रस्त्याच्या बाजूने शेळ्या-मेंढ्याचे कळप जावेत. अशा प्रकारे शेकडोच्या संख्येने गोवंश सलगरे गावाच्या माळनारानावर चरताना दिसतो. मुळात त्यांना दावं लावलं जात नाही. शेळ्या-मेंढ्या कोंडतात, तसे त्यांना वाड्यात कोंडले जाते. गायींचे दूध न काढता त्यांच्या वासरांनाच पाजले जाते. त्यामुळे धष्टपुष्ट वासरं, खोंडं माळरानांवर हुंदडताना दिसतात.

स्सल खिल्लार गोवंशाची खाण
देशभरात काही वर्षांपूर्वी संकरीकरणावर भर दिल्यामुळे मिश्र गोवंशाची संख्या वेगाने वाढली आहे. परिणामी देशी, अस्सल गोवंशाची संख्या कमी होत आहे. मानदेश (माण, खटाव, आटपाडी, जत, सांगोला) जातीवंत खिल्लार पैदाशीचे मुख्य प्रदेश होता. पण, आता या ठिकाणीही खिल्लार गोवंशाची संख्या कमी झाली आहे. सलगरे परिसरातही खिल्लारची पैदास आता कमी होऊ लागली आहे. विदर्भात गवळाऊ जातीच्या गोवंशाचे कळप दिसतात. तसेच कळप सलगरे गावात खिल्लारचे दिसतात. अस्सल खिल्लार जातीचा पांढरा, कोसा, हरण्या खिल्लार येथे खात्रीपूर्वक मिळतो.

हेही वाचा >>>मुळशी-मुंबई मार्गाचे काम एक महिन्यात मार्गी लागणार ; उच्च न्यायालयाची भूसंपादनाला परवानगी

स्थानिक बाजारपेठ विकसित
सलगरे सीमाभागात असल्यामुळे कवठेमहांकाळ, जत, सांगोल येथील आठवडी जनावरांचे बाजारात येथील गोवंशाला विशेष मागणी असते. कर्नाटकातील बेळगावसह विजयपूर, धारवाड, गुलबर्गा, बागलकोट येथूनही हौशी शेतकरी थेट शेतकऱ्यांच्या वाड्यात जाऊन खरेदी करताना दिसतात. बैलगाडा शर्यतीसाठी येथील खिल्लार बैलांना विशेष पसंती दिली जाते.

सलगरे गावात दहा वर्षांपूर्वी गोवंशाची संख्या लाखोंच्या घरात होती. आता शेकड्यात आली आहे. आजही दावणीला खिल्लार गाय, बैल असावा म्हणून हौसेने गोपालन करणारे अनेक जण येथून गोवंशाची खरेदी करतात. शर्यतींसाठी आणि धार्मिक महत्त्व असल्याने कर्नाटकातून मोठ्या संख्येने शेतकरी गोवंशाच्या खरेदीसाठी सलगरे परिसरात येतात. परिसरातील जनावरांच्या बाजारातही येथील गोवंशाला चांगली मागणी असते.– अनिल पाटील, शेतकरी, गोवंश अभ्यासक

Story img Loader