मध्ययुगीन काळात रामदास स्वामींनी भारतभर भ्रमंती केली आणि बलोपासनेचं महत्व लोकांना पटवून दिलं. पुण्यातील एक तालीमही समर्थांच्या पुढाकाराने बांधली गेली, ती तालीम म्हणजे ‘देवळाची तालीम’. पुण्यातील देवळाच्या तालमीचा इतिहास ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागातून जाणून घेऊयात.
देवळाची तालमीचे वस्ताद पै. विश्वास मानकर यांनी या व्हिडिओत तालमीचा इतिहास, मारुती मंदिरातील मूर्ती याबद्दल माहिती दिली. तसेच या तालमीला देवळाची तालीम असे आगळेवेगळे नाव का देण्यात आले? वासुदेव बळवंत फडके आणि लहुजी वस्ताद साळवे यांचा या तालमीशी काय संबंध? याबाबतही मानकर यांनी सविस्तर माहिती दिली.