पुणे विद्यापीठाचा ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा होत असलेला नामविस्तार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेला मान्य असल्याचे परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुणे विद्यापीठाच्या नामविस्तारामध्ये विद्यापीठाच्या नावातून ‘पुणे’ हा शब्द वगळावा, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाचे नेते राजा ढाले यांनी केली होती. त्याला विरोध करीत नामविस्ताराला विरोध करणाऱ्या ढाले यांचा बोलविता धनी कोण आहे, अशी विचारणा परशुराम वाडेकर यांनी केली होती. त्या पाश्र्वभूमीवर हा नामविस्तार आम्हाला मान्य असल्याचे समता परिषदेने स्पष्ट केले आहे.
पुणे विद्यापीठाचा नामविस्तार ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा करण्याचा ठराव विद्यापीठाच्या अधिसभेने संमत केला आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. विद्यापीठाच्या नामविस्तारातून पुणे हा शब्द वगळावा, अशी समता परिषदेची भूमिका नाही. मात्र, हा नामविस्तार करण्याची कार्यवाही लवकरात लवकर झाली पाहिजे, अशीच अपेक्षा असल्याचे कृष्णकांत कुदळे यांनी सांगितले.
राजा ढाले यांचा नामोल्लेख टाळून प्रा. हरी नरके म्हणाले, प्रबोधन परंपरेमध्ये पुण्याचा वारसा व्यापक आणि समृद्ध आहे. लोकशाहीमध्ये विचारस्वातंत्र्य असल्याने प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे यासंदर्भात कोणी काय म्हणावे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. पुणे विद्यापीठाचा नामविस्तार सलोख्याच्या वातावरणात होत असताना त्यामध्ये खोडा घालण्याचे काम काही मंडळी जाणीवपूर्वक करीत आहेत. त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे होईल.
महात्मा फुले समता पुरस्कार
कुमार केतकर यांना जाहीर
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे ज्येष्ठ पत्रकार आणि ‘दिव्य मराठी’चे प्रमुख संपादक कुमार केतकर यांना यंदाचा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, महात्मा फुले पगडी आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (२८ नोव्हेंबर) समता भूमी येथील महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक येथे सकाळी दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते केतकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कृष्णकांत कुदळे यांनी दिली.

Kolhapur Shivaji university
भविष्य निर्वाह निधी विभागाची शिवाजी विद्यापीठाला कारणे दाखवा नोटीस, भ्रष्टाचाराच्या आरोपाने खळबळ
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Aided private Ayurveda Unani colleges will get professors
अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांना मिळणार प्राध्यापक; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निवड समितीची रचना जाहीर
The Cabinet meeting decided to name the Kaushal University after Ratan Tata print politics news
कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
G N Saibaba
GN Saibaba Passed Away : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांचे निधन; रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
Guardian Minister Dada Bhusey sentiments regarding Government Medical College nashik news
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणे नाशिकसाठी गौरवास्पद – पालकमंत्री दादा भुसे यांची भावना
Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University Winter 2024 exam dates announced Nagpur news
नागपूर: विद्यार्थ्यांनो; विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या सविस्तर…
dr babasaheb ambedkar marathwada university
छत्रपती संभाजीनगर: विद्यापीठाच्या ग्रंथालयात पावसाचे पाणी शिरले; प्रशासनाची तारांबळ