पुणे : ‘इंडियाज गाॅट लेटेंट’ या वादग्रस्त कार्यक्रमात अश्लील वक्तव्य केल्याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्याविरुद्ध मुंबईसह देशभरातील वेगवेगळ्या शहरात गुन्हे दाखल झाले. याप्रकरणात आसाम पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहे. ‘इंडियाज गाॅट लेटेंट’ कार्यक्रमात वादग्रस्त, तसेच अश्लील वक्तव्य केल्याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्याविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ही कारवाई केली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला आयोगाने अलाहाबादिया, रैना यांच्यासह ३० जणांना समन्स बजावले आहे.आसाममध्ये अलबादिया आणि रैना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आसाम पोलिसांचे पथक पुण्यात पोहोचले. समय रैना बालेवाडीतील एका सोसायटीत राहायला आहे. बालेवाडीतील निवासस्थानी जाऊन आसाम पोलिसांनी समन्स बजावले, असे ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.