कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणातून संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी माघार घेतली. शिवसेना नेत्यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली असून त्यामुळे महाविकास आघाडीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> कसबा विधानसभा पोटनिवडणूक : “अमित शाह आल्यावर जनता माझा प्रबळपणे प्रचार करेल” रविंद्र धंगेकर यांचा विश्वास

कसबा पेठेत महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसने उमेदवार दिला आहे, तर चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. या  दोन्ही ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांनी अर्ज भरले होते. संभाजी ब्रिगेडची शिवसेनेशी युती आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मध्यस्थीनंतर संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी संभाडी ब्रिगेडच्या नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर  कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतून संभाजी ब्रिगेडने माघार घेत महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला.