पुणे: संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपट निर्मात्यांना दिलेल्या इशाऱ्यानंतर संभाजी ब्रिगेड या विषयावरून आक्रमक झाली आहे. संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी शहरामध्ये सुरू असलेला हर हर महादेव चित्रपट बंद पाडला आहे. विशाल टॉकीजमध्ये हा शो सुरू होता, तेव्हाच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते थिएटरमध्ये घुसले. थिएटरमध्ये असणाऱ्या सर्व प्रेक्षकांना बाहेर काढून त्यांनी हा शो थांबवला. यामुळे थिएटरमध्ये काहीकाळ तणावाचे वातावरणात निर्माण झाले होते.
पाहा व्हिडीओ –
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. यावेळी त्यांनी अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांचा उल्लेख केला होता. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजेंनी मराठी निर्माते, दिग्दर्शकांना जाहीर इशाराही दिला होता.