लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यातून चंदनाची तीन झाडे कापून नेल्याची घटना उघडकीस आली. पसार झालेल्या चंदन चोरट्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
याप्रकरणी चंदन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पांडीयराज मुरुगन (वय ३०) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लष्कर भागातील पूना क्लबजवळ डॉ. राजेंद्रसिंग मार्गावर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे बंगले आहेत. बंगले प्रशस्त आहेत. नाताळानिमित्त लष्करी अधिकारी बाहेरगावी गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री चोरटे बंगल्याच्या आवारात शिरले. चोरट्यांनी चंदनाची तीन झाडे कापून नेली. चंदनाची झाडे चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक डॉ. आरिफा मुजावर यांनी दिली.
आणखी वाचा-कात्रज घाटात पिस्तुलातून गोळी झाडून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या बंगल्यास भेट दिली. बंगल्याचे आवार प्रशस्त आहेत. बंगल्यात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे चित्रीकरण उपलब्ध झाले नाही. पसार झालेल्या चोरट्यांचा पोलिसांकडून माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक मुजावर तपास करत आहेत.
चंदन चोरीचे ३० गुन्हे दाखल
शहरात गेल्या काही महिन्यांपासून चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शासकीय, तसेच शैक्षणिक संस्थांचे आवार, बंगले, सोसायटींच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. वर्षभरात चंदनाची झाडे कापून नेण्याचे ३०गुन्हे दाखल झाले आहेत.