पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या आवारातील (एनडीए) चंदनाचे झाड तोडण्यासाठी आलेली चोरट्यांची टोळी आणि सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत शुक्रवारी एका चोराचा मृत्यू झाला.
एनडीए आवारातील चंदनाची झाडे तोडून नेण्याच्या उद्देशाने चोरट्यांची टोळी आली होती. एनडीएच्या आवारातील मनोज पांडे ब्लॉकजवळ सुरक्षारक्षक आणि चोरट्यामध्ये चकमक उडाली. चोरट्यांनी सुरक्षारक्षकांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी गोळी लागल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. संबंधित व्यक्तीची ओळख पटलेली नाही. सुरक्षारक्षकांच्या गोळीबारानंतर उर्वरित चोरटे घटनास्थळावरून पळून गेले. एनडीएमधील अधिकाऱयांनी घटनास्थळावरून संबंधित मृतदेह ताब्यात घेतला आहे.