पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली. दोन महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या आवारातून चंदनाची पाच झाडे कापून नेण्याची घटना घडली होती. शहरात चंदनांची झाडे कापून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, चोरट्यंना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.
हेही वाचा >>> पुणे : सायबर चोरट्यांकडून तिघांची ६८ लाखांची फसवणूक
याबाबत सुरक्षारक्षकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विद्यापीठाच्या आवारातील राष्ट्रीय खगोल भौतिकी केंद्राच्या (आयूका) आवारात चोरटे शिरले. चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना उघडकीस आली. पोलीस कर्मचारी मोमीन तपास करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या आवरातून पाच चंदनाची झाडे कापून नेण्यात आली होती.
हेही वाचा >>> अमेरिकेतील शिवशार्दूल पर्कशन्सच्या ढोल-ताशा गर्जनेची दशकपूर्ती
शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. विविध शासकीय संस्था, बंगले, सोसायटी, तसेच शैक्षणिक संस्थांच्या आवरातून चंदनाची झाडे चोरट्यांनी कापून नेली. चंदन चोरट्यांनी पंधरा दिवसांपूर्वी मुकुंदनगर भागातील एका सोसायटी, तसेच मार्केट यार्ड भागातील एका बंगल्याच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेली होती. चंदन चोरट्यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), राजभवन, तसेच खडकीतील दारुगोळा कारखान्यात शिरुन चंदनाची झाडे कापून नेली होती. चंदन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
© IE Online Media Services (P) Ltd