पुणे : शहरात चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील एका बंगल्यात शिरून चोरट्यांनी शस्त्राच्या धाकाने चंदनाचे झाड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदार महिला आणि कुटुंबीय प्रभात रस्ता परिसरातील भारती निवास काॅलनीत राहायला आहेत. जुन्या कर्नाटक शाळेजवळ त्यांचा बंगला आहे. शनिवारी (१० ऑगस्ट) मध्यरात्री चंदन चोरटे बंगल्यात शिरले. गाढ झोपेत असलेल्या महिला आणि तिच्या कुटुंबीयांना बंगल्यात कोणीतरी शिरल्याचे कळाले. चोरट्यांचा आवाज त्यांनी ऐकला. महिला बंगल्याच्या आवारात आली. त्यावेळी सात ते आठ चोरटे आवारातील चंदनाचे झाड करवतीने कापत असल्याचे लक्षात आले. महिलेने आरडाओरडा केला. तेव्हा चोरट्यांनी महिला आणि तिच्या कुटुंबीयांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा – सुप्रिया सुळे यांचा फोन, व्हॉट्सअ‍ॅप हॅक; स्वतःच दिली माहिती

चोरट्यांनी बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेले. घाबरलेल्या महिलेने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक शेळके तपास करत आहेत.

हेही वाचा – पुणे : किरकोळ कारणातून टोळक्याकडून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला

शहरात वर्षभरापासून चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, बंगले, सोसायटीच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्यात आली आहे. चंदन चोरीच्या घटना वाढल्या असून, चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandalwood was stolen at gunpoint by entering a bungalow on prabhat street terror of sandalwood thieves pune print news rbk 25 ssb