मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त बुधवारी मुंबईकडे रवाना झाला. दुपारी तो मुंबईला आपल्या निवासस्थानी पोहोचला. संजय दत्तला कारागृह प्रशासनाने १४ दिवसांची अभिवाचन रजा (फर्लो) मंजूर केली आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संजय दत्त कारागृहातून बाहेर पडला. येरवडा कारागृहाच्या मागील दरवाज्यातून तो बाहेर पडला आणि लगेचच मुंबईकडे रवाना झाला
सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पैकी १८ महिने शिक्षा त्याने पूर्वी भोगली आहे. मे २०१३ पासून तो कारागृहात आहे. शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण झाल्यानंतर कैद्याला १४ दिवसांची फर्लो रजा दिली जाते. त्यामध्ये आणखी १४ दिवस मुदतवाढ मिळू शकते. संजय दत्तने काही दिवसांपूर्वी फर्लो रजेसाठी कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्याची रजा मंजूर केल्याची माहिती येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी दिली.

Story img Loader