माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर या सध्या त्यांच्या ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकामुळे चर्चेत आहेत. पोलिसांच्या कार्यलय आणि घरांसाठी जमीन आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी जमिनीच्या हस्तांतरणाच नकार दिला होता. दादांना तुम्हाला भेटायचं आहे हे मला सांगण्यात आलं होतं. मी जेव्हा अजित पवारांना भेटले तेव्हा येरवड्यातील तीन एकर जमिनीबाबत चर्चा झाली. ही जागा पुणे पोलिसांची आहे, भविष्यात पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ही जागा पोलिसांसाठी उपयुक्त ठरणार आहे असं आपण त्यांना सांगितल्याचं मीरा बोरवणकर यांनी म्हटलं. काही वेळापूर्वीच त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. याच पत्रकार परिषदेत त्यांनी संजय दत्तबाबतचाही एक प्रसंग सांगितला.

संजय दत्तबाबत काय म्हणाल्या मीरा बोरवणकर?

संजय दत्तला रात्रीच्या वेळी मुंबईहून पुण्यातल्या येरवडा तुरुंगात आणलं गेलं तेव्हा तो आजारी झाला होता, तेव्हा नेमकं काय झालं होतं? हे विचारलं असता मीरा बोरवणकर म्हणाल्या, “सेलिब्रेटी संजय दत्त होता, आमच्यासाठी तो आरोपी होता. त्याला पुण्याला शिफ्ट करायचं ठरलं होतं. आधी एकदा शिफ्ट करताना इतके मीडियाचे लोक आमच्या गाडीच्या मागे आले की तो सगळा प्रसंग हास्यास्पद झाला होता. त्यानंतर यावेळी संजय दत्तला शिफ्ट करताना आम्ही ठरवलं संजय दत्तला आर्थर रोडहून येरवड्याला आणताना कुणाला कळायला नको. त्यामुळे आम्ही रात्री त्याला आर्थर रोड तुरुंगातून येरवडा तुरुंगात आणत होतो. त्यावेळी संजय दत्त घाबरला होता त्याला वाटलं की माझा रस्त्यात कुणीतरी एन्काऊंटर करतील. तो आजारीही झाला होता. आम्ही त्याला ज्या रात्री त्याला शिफ्ट करणार होतो त्यावेळी डीआयजी रँकचा अधिकारी पाठवला होता. मात्र त्यावेळी आम्ही त्याला शिफ्ट केलं नाही कारण त्याची तब्बेत बिघडली होती. आम्ही संजय दत्तला हे पण सांगितलं की तुरुंगाचे अधिकारी कधीही एन्काऊंटर करत नाही. आम्ही तुला सुरक्षितपणे येरवडा तुरुंगात आणू, असं सांगितल्यावर त्याला पटलं आणि आम्ही त्याला येरवड्याला आणलं.” असा प्रसंग मीरा बोरवणकर यांनी सांगितला.

Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

हे पण वाचा- “शासकीय जागेवर बिल्डरची नजर असतेच”, मीरा बोरवणकरांचा पुन्हा आरोप, म्हणाल्या…

कसाबला येरवड्यात आणणताही सिक्रेसी पाळली

कसाबला आम्ही येरवडा या ठिकाणी आणलं ते देखील आमच्यासाठी आव्हान होतं. त्याला आर्थर रोडमधून बाहेर काढणं, क्राईम ब्रांचकडून त्याचा ताबा घेणं आणि येरवड्याला आणणं हे सगळं सिक्रेट ऑपरेशन होतं. मात्र मुंबईतल्या एका पत्रकाराला कसाबला पुण्याला आणणार हे समजलं. आम्ही त्याला फाशी द्यायला येरवड्यात आणतो आहोत हे त्या पत्रकाराला माहित नव्हतं असंही मीरा बोरवणकर यांनी म्हटलं आहे.

Story img Loader