पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंसाठी प्रचार करत आहेत. यावरूनच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. पार्थ पवारांचे वडील अजित पवार हे मावळमध्ये उतरले असले, तरी श्रीरंग बारणे यांचा पराभव अटळ आहे. असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे. बारामतीत नवरा म्हणून उतरणारे अजित पवार यांच्या पत्नीचा म्हणजे सुनेत्रा पवार यांचा पराभव होईल. असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

संजय राऊत यांच्या हस्ते पिंपरीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे, शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
maharashtra assembly election 2024 amit thackeray sada saravankar mahesh sawant dadar mahim assembly constituency
लक्षवेधी लढत : दोन्ही ठाकरेंसाठी वर्चस्वाची लढाई
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
maharashtra assembly election 2024 ramtek nagpur rebellion in one constituency party loyalty in another Congress MP ex minister in rebel campaign
एका मतदारसंघात बंडखोरी, दुसऱ्यामध्ये ‘पक्षनिष्ठा’; काँग्रेस खासदार, माजी मंत्री बंडखोराच्या प्रचारात
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई

हेही वाचा…आरटीई अंतर्गत किती अर्ज दाखल? अर्ज भरण्यासाठी राहिले दोनच दिवस!

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभेत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांचा श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता. आता त्याच अजित पवारांना श्रीरंग बारणे यांचा प्रचार करावा लागत आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, आता तेच अजित पवार हे श्रीरंग बारणेचा पराभव करतील. २०१९ मध्ये पार्थ पवारसाठी वडील अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आता बारामतीत नवरा म्हणून अजित पवारांना निवडणुकीत उतरावं लागत आहे. तरीही मावळमध्ये श्रीरंग बारणे यांचा आणि बारामतीत सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.