काही दिवसांपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी आमदार राहुल कुल आणि मंत्री दादा भुसे यांच्याशी संबधित कारखान्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्याकडे तक्रारही दाखल केली होती. मात्र, फडणवीसांनी यावर कोणतीही कारवाई केली असा आरोप करत संजय राऊतांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याप्रकरणी जर कारवाई होणार नसेल तर हे सरकार लफंग्याला पाठिशी घालतंय हे फडणवीसांनी मान्य करावं, असे ते म्हणाले. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – मुख्यमंत्री बदलाच्या दिल्लीत हालचाली? अजित पवार मुख्यमंत्री होणार? पत्रकारांच्या प्रश्नांवर शरद पवारांचे थोडक्यात उत्तर

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष

नेमकं काय संजय राऊत?

“आर्थिक गैरव्यवहाराच्या नावाखाली आज विरोधीपक्षांतील अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्यात येत आहे. १०-२० लाखाच्या व्यवहारासाठी त्यांच्या कुटुंबियांचीदेखील चौकशी केली जाते. मग मी दादा भुसे आणि राहुल कुल यांच्याशी संबंधित कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणं पुढं आणली असताना यांच्यावर कारवाई का होत नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

“तेव्हा तुम्ही कोणत्या नशेत असता?”

“दादा भुसे यांनी मालेगावातील गिरणा कारखाना बचावच्या नावाखाली १०० कोटी रुपये जमा केले. त्या पैशांचा काय झालं? आज कारखाना कुठेही दिसत नाही, मग पैसे गेले कुठं? या भ्रष्टाचाराच्या चौकशी मागणी केली, तर म्हणतात की आम्ही नशेत आहोत. मग तुम्ही आमच्या लोकांवर कारवाई करता, तेव्हा तुम्ही कोणत्या नशेत असता?” अशी टीकाही त्यांनी फडणवीसांवर केली.

“मी दौंडच्या कारखान्याचा ऑडीट रिपोर्टही फडणवीसांना दिला आहे. त्याच्या चौकशीही मागणी आम्ही केली होती. यासंदर्भात बोलण्यासाठी मी फडणवीसांना भेटीची वेळही मागितली. पण त्यांच्याकडे मला भेटायला वेळ नाही. हे सरकारने नेमकं कोणत्या नशेत काम करते आहे माहिती नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – बारसू रिफायनरीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

“…तर फडणवीसांनी हे मान्य करावं”

“आर्थिक गैरव्यवहाराविषयी दौंडमधील शेतकरी कृती समितीने एका सभेचं आयोजन केलं आहे. ही शेतकऱ्यांची लढाई आहे. त्यासाठी मी जाणार आहे. जर सरकार भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन आणि दादा भुसेंवर गुन्हे दाखल करणार नसेल तर विरोधकांवर कारवाई करण्याचा कोणताही नैतिक अधिकार त्यांना नाही. जर या दोघांवर कारवाई होणार नसेल तर हे सरकार लफंग्याला पाठिशी घालतंय हे फडणवीसांनी मान्य करावं”, असं आव्हानही त्यांनी दिलं.

“मी कोणत्याही परिस्थिती दौंडमध्ये सभा घेणार”

दरम्यान, संजय राऊतांच्या दौंडमधील सभेपूर्वी शिंदे सरकारकडून भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याबाबतही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शेतकऱ्यांनी सभेला येऊ नये यासांठी त्यांना अडवलं जात आहे. आता कलम १४४ लागू केली आहे. मात्र, मी कोणत्याही परिस्थिती दौंडमध्ये जाऊन सभा घेणार आहे. या सरकारला प्रमाणिकपणाची भीती वाटते”, असे ते म्हणाले.

Story img Loader