पुणे : २०६ व्या शौर्यदिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आणि क्रिडा युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी अभिवादन केले. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर अजित पवार यांनी भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘आरपीएफ’चे असेही प्रसंगावधान! तब्बल ४४ रेल्वे प्रवाशांना जीवनदान

हेही वाचा – थंडीच्या लाटांची शक्यता कमीच

पुण्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेत ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, असल्या सोम्यागोम्याने बोललेल्यावर मी बोलत नाही, अशी भूमिका मांडत संजय राऊत यांच्या टीकेला अजित पवार यांनी अगदी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिले.

आक्रोश मोर्चात काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले, मी एक वक्तव्य ऐकलं, ‘काहीही झाले तरी मी तुम्हाला पाडणारच…’ पण, आमच्या पाडा पाडीच्या खेळात पडला, तर पहिले तुम्ही पडाल… नाव घेऊन बोलायचं असतं, आमच्यात दम आहे. ‘हवा बोहोत तेज चल रही है, अजितराव… टोपी उड जायेगी, असे विधान केले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticizes ajit pawar at shetkari akrosh morcha in pune ajit pawar replied to sanjay raut criticism in few words svk 88 ssb
Show comments