पुणे : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा सोहळा होत आहे. हा सोहळा देशातील प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे. आम्ही त्याच्यामध्ये स्वतः बलिदानाच्या समिधा टाकल्या आहेत. हा सांस्कृतिक सोहळा आहे, मात्र भाजपाने त्यास राजकीय सोहळा केला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी पुणे दौऱ्यावर असताना केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे उद्घाटन होत आहे. त्या दृष्टीने जय्यत तयारीदेखील करण्यात आली आहे, पण या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून अनेक आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे भाजपाकडून राजकीय हेतूने इव्हेंट केला जात आहे का ? अशी चर्चा सुरू आहे. त्यांवर संजय राऊत यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – पुणे : येरवड्यात वाहने फोडणाऱ्या गुंडांची धिंड

संजय राऊत पुढे म्हणाले की, आपल्या घरातील लग्न असावे त्या पद्धतीने ते निमंत्रण वाटत आहेत. माझ्या घरच्या लग्नाला यायचे, अशा पद्धतीने हे निमंत्रण पत्रिका वाटत सुटले आहेत. जणू काही राम मंदिराचे यांनी मंगल कार्यालय केले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली.

हेही वाचा – Video: गोष्ट पुण्याची – लाल मातीबरोबर राजकीय आखाडेही गाजवणारी पुण्यातील कुंजीर तालीम!

प्रभू श्रीराम सर्व पाहत आहेत. हा त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या, मग आम्ही पाहू. असंख्य शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान दिले आहे. त्यामुळे हा संपूर्ण सोहळा होऊन जाऊ द्या, आम्हाला त्यास कोणत्याही प्रकारचा गालबोट लावू द्यायचा नाही. पण आम्ही योग्य वेळ आली की बोलू, अशी भूमिका मांडत पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticizes bjp over ram temple he said this is a political event of bjp svk 88 ssb
Show comments