पुणे : दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना दरम्यान ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमा दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचं, अस वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी केल.या विधानाच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनी येथील उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थाना बाहेर आंदोलन केले.त्याच दरम्यान ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले.त्यानंतर पुण्यातील शिंदे गटाचे शिवसैनिक अधिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत असून अलका टॉकीज चौकात शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली संजय राऊत यांच्या विधानाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.यावेळी संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी नाना भानगिरे म्हणाले की, त्याकाळात शिवसेनेमध्ये कशा प्रकारे काम चालायच याबाबत नीलम गोऱ्हे यांनी भूमिका मांडली आहे.त्यानंतर संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल जे विधान केले आहे.ते निषेधार्थ असून राज्यातील महिलांचा अपमान त्यांनी केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी नाक घासून माफी मागावी,तसेच आज आम्ही संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदवित आहोत,येत्या काळात संजय राऊत पुण्यात आल्यावर आम्ही त्यांच्या तोंडाला काळे नक्कीच फासणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
तसेच ते पुढे म्हणाले,”पद वाटप करतेवेळी जे अर्थकारण चालयच, त्याबाबत नीलम गोऱ्हे यांनी भूमिका मांडली आहे.तोच अनुभव मला पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक होतो.त्यावेळी शहर प्रमुख आणि स्थायी समिती सदस्य होण्यासाठी संजय राऊत यांनी जिल्हा संपर्क नेते बाळा कदम यांच्यामार्फत २५ लाखांची मागणी केली होती.बाळा कदम हे संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी होते.त्यामुळे त्यांनी मला अधिक बोलण्यास लावू नका,संजय राऊत यांनी कोणाकडून किती पैसे मागितले, याबाबत लवकरच जाहीर करू असा इशारा देखील त्यांनी दिला.