सरहद संस्थेतर्फे देण्यात येणारा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांना, सांस्कृतिक आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे.
सरहदचे विश्वस्त भारत देसरडा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, पुरस्कार समितीचे अध्यक्ष संतसिंग मोखा उपस्थित होते. नय्यर हे पंजाबी चळवळीचे प्रणेते मानले जातात. त्यांची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. एक लाख एक हजार रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण समारंभ ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात होणार आहे. या वेळी अखिल भारतीय साहित्य संमेलन होत असलेल्या पंजाबमधील घुमान या गावचे सरपंच हरबन्ससिंग उपस्थित राहणार आहे. हा पुरस्कार आतापर्यंत विजयकुमार चोपडा, एस. एस. विर्क, गुलजार, यश चोप्रा, माँटेकसिंग अहलुवालीया, जातींदर पन्नू, सत्यपाल सिंग, के. पी. एस. गिल यांना देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा