Sarang Punekar : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिक्षण घेणारी पहिली उच्चशिक्षित ट्रान्सजेंडर सारंग पुणेकरने राजस्थानच्या जयपूरमध्ये आपलं आयुष्य संपवलं आहे. सारंग पुणेकर उच्चशिक्षित होत्या. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील पहिल्या ट्रान्सजेंडर विद्यार्थी होत्या. गुरुवारी पुण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी ट्रान्सजेंडर्ससाठीच्या अनेक चळवळींमध्ये भाग घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात सारंग पुणेकर यांनी पुण्यातील वंचितांसाठी महत्त्वाचं कार्य केलं होतं. ट्रान्सजेंडर समुदायातून उच्च शिक्षण घेतलेल्या त्या पहिल्या विद्यार्थी होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थानमध्ये ट्रान्सजेंडर समुदायासह राहात होत्या सारंग पुणेकर

राजस्थानच्या जयपूरमध्ये सारंग पुणेकर ट्रान्सजेंडर समुदायासह राहात होत्या. तसंच तिथल्या तृतीयपंथीय समाजासाठी त्या कार्यरतही होत्या. आम्ही सारंगला पुण्यात परत येण्याबद्दल विचारणा केली होती. असं अश्विनी सातव यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

सारंग पुणेकर आंबेडकर चळवळीच्या समर्थक

सारंग पुणेकर या आंबेडकर चळवळीच्या समर्थक होत्या. NRC आणि CAA विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. जात आणि शक्ती पदानुक्रमाच्या विश्लेषणात त्या प्रचंड हुशार होत्या. विद्यापीठातील पहिली ट्रान्सजेंडर विद्यार्थी म्हणून, तिची उपस्थिती आमच्यासाठी, शैक्षणिक तसेच प्रशासक म्हणून एक अनोखा अनुभव होता,” असं एसपीपीयूमधील महिला अभ्यास विभागाच्या प्रमुख डॉ. अनघा तांबे यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- ‘तिसरी’ आशा

सुषमा अंधारे यांनी काय म्हटलं आहे सारंग पुणेकर यांच्याबाबत?

सारंग पुणेकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या लोकांमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचाही समावेश होता. सारंग पुणेकर यांनी अल्पावधीतच एक उत्साही वक्त्या आणि लिंग हक्क आणि इतर कारणांसाठी समर्थक म्हणून स्वतःचे नाव कमावले होते. “विद्यार्थी असताना, पुणेकरांनी लिंगभेद अभ्यासाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन समाजापुढे ठेवला. सारंगला आणखी ज्ञान आत्मसात करायचे होते आणि सारंगला समुदायाच्या भाषा आणि चालीरीतींबद्दल मौलिक काम करायचे होते. समाज म्हणून आपण सारंगच्या स्वप्नांना पाठिंबा देऊ शकलो नाही हे आपले अपयश आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

सारंग पुणेकर यांनी तृतीयपंथीयांसाठी मोलाचं कार्य केलं

सारंग पुणेकर यांनी पुण्यातील वंचित महिला आणि लिंगभेदावर काम करणाऱ्या एनजीओ सम्यकमध्ये उत्तर महाराष्ट्रात प्रादेशिक समन्वयक म्हणून काम केले होते. एनजीओचे कार्यकारी संचालक आनंद पवार म्हणाले की, त्यांना सुरुवातीला सम्यक म्हणून संबोधण्यात आले होते परंतु नंतर त्यांना सामावून घेण्यात आले. “विकास क्षेत्रात एचआयव्ही प्रतिबंधक कार्यक्रमांमध्ये ट्रान्सजेंडर लोकांना काम देणे नेहमीच सामान्य आहे. परंतु तिने स्टिरियोटाइप तोडला आणि गर्भपाताच्या अधिकारांसाठी काम केले. समन्वयक म्हणून तिने हा प्रकल्प यशस्वीरित्या राबवला,” असे ते म्हणाले.

२०२० पासून सारंग पुणेकर राजस्थानात

सारंग पुणेकर यांना काम करत असताना सरकारी अधिकारी, डॉक्टर आणि एनजीओंशी समन्वय साधावा लागला. हा प्रकल्प २०२० मध्ये पूर्ण झाला आणि सारंग पुणेकरने राजस्थानला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. “सारंगने सांगितले की तिला तिथल्या समुदायासोबत राहायचे आहे,” पवार म्हणाले. याच सारंग पुणेकर यांनी आत्महत्या करुन त्यांचं आयुष्य संपवलं आहे. १७ जानेवारीला ही घटना समोर आली. सारंग पुणेकर यांच्या पार्थिवार गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarang punekar first transgender student of sppu in pune dies by suicide scj