पुणे : ‘स्वारगेट बलात्कार प्रकरणात पीडित तरुणीचे चारित्र्यहनन करणारी वक्तव्ये समाजमाध्यमांसह इतर ठिकाणी केली जात आहेत. अशा वक्तव्यांमुळे पीडित तरुणीवर मानसिक परिणाम होत असून, न्यायालयाने याबाबत प्रतिबंधात्मक आदेश द्यावेत,’ अशी विनंती ॲड. असीम सरोदे यांनी सोमवारी न्यायालयाकडे केली. याबाबत ॲड. सरोदे यांनी न्यायालयात अर्ज सादर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वारगेट बलात्कार प्रकरणात पसार झालेल्या आरोपीला ७२ तासांनी अटक करण्यात आली. आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात पीडित तरुणीबाबत काही वक्तव्ये केले. समाजमाध्यमात या प्रकरणात काही वक्तव्ये करण्यात आली आहे. अशा वक्तव्यांमुळे तरुणीच्या मानसिकेतवर परिणाम होत असून, न्यायालयाने प्रतिबंधात्मक आदेश द्यावेत, असा अर्ज ॲड. सरोदे यांनी न्यायालयात सादर केला. वृत्तपत्रस्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. प्रसारमाध्यमांनी न्यायालयात घडलेल्या घटनांचे वार्तांकन केले पाहिजे. मात्र, काही राजकारणी, अधिकारी खोट्या बातम्या पसरवित आहेत, असे ॲड. सरोदे यांनी सांगितले.