शिवशाहिरांकडून आठवणींना उजाळा; सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीस प्रारंभ

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील ओव्या, गीते, कथा, म्हणी, उखाणे असा लोकवाङ्मयाचा अफाट संग्रह असलेल्या सरोजिनीअक्का म्हणजे सरस्वतीची लाडकी लेकच, अशा शब्दांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ज्येष्ठ साहित्यिका आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या आठवणींना उजाळा दिला. मी अक्कांचा लाडका सख्खा भाऊ होतो आणि आजही त्या घराशी माझे भावंडाचे नाते आहे, असेही त्यांनी सांगितले.

Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
rape and murder of 2 minor sisters in Pune
Pune Rape-Murder : पुणे जिल्हा हादरला! दोन अल्पवयीन बहि‍णींवर बलात्कार करून खून; ५४ वर्षीय आरोपीला अटक
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा

लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षांस सोमवारपासून (७ जानेवारी) प्रारंभ होत आहे. हे औचित्य साधून बाबर यांच्याशी असलेले बंधुत्वाचे नाते पुरंदरे यांनी उलगडले. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती या विषयावरच बाबर यांनी विपुल लेखन केले. राज्य शासनाच्या लोकसाहित्य समितीचे अध्यक्षपद भूषविलेल्या बाबर यांनी दूरदर्शनसाठी ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्यासमवेत ‘रानजाई’ या लोकगीतांवरील कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्या दोन वेळा राज्यसभा खासदार होत्या.

लेखन, गायन, वक्तृत्व आणि नेतृत्व अक्काताईंच्या देहात जन्मत:च पेरले गेले आणि तेच पुढे डौलदार वृक्षासारखे वाढतही गेले, असे सांगून पुरंदरे म्हणाले,की सरोजिनीअक्का यांचे वडील कृ. भा. बाबर हे अभ्यासू शिक्षक होते. चाणाक्ष आणि विधायक दृष्टीने पाहणारे बाबर सर हे मला वडिलांइतकेच प्रिय आणि तेवढेच स्पष्टवक्ते मार्गदर्शक होते.

Story img Loader