पुणे : देशाला स्वतंत्र करण्यासाठी समाजाला संघटित करण्याच्या उद्देशातून एकोणिसाव्या शतकात गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांनी स्थापन केलेली, स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करण्यासाठी झटणारी, एकविसाव्या आव्हानांना समर्थपणे तोंड देणारी, तीन शतकांचा दुवा सांधणारी ‘पुणे सार्वजनिक सभा’ ही संस्था नव्या वास्तूसह अनमोल दस्तावेजांचे डिजिटीकरणाच्या माध्यमातून जतन करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी आर्थिक साहाय्याची गरज आहे…

रतातील सरंजामशाही आणि राजेशाहीचे युग संपून १८५७ नंतर इंग्रजी सत्तेमुळे नवीन विद्या, नवीन विचार आणि नवीन तत्त्वज्ञान आले. विवेक युगाचा प्रारंभ झाला. महात्मा फुले, सार्वजनिक काका, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक या समाजधुरिणांच्या कार्याने त्या कालखंडात पुनरुत्थानन आणि प्रबोधन पर्व सुरू झाले. समाज सुधारणेच्या वैयक्तिक प्रयत्नांनंतर समाजामध्ये थोडी जागृती निर्माण होऊन लोक एकत्र येऊन चर्चा करू लागले होते. त्यातूनच भारतामध्ये संस्थात्मक जीवनाला प्रारंभ झाला. बंगालमधील ब्रिटिश इंडिया असोसिएशन (१८५१), मद्रास नेटिव्ह असोसिएशन (१८५२), बॉम्बे असोसिएशन (१८५२), पुणे येथील डेक्कन असोसिएशन (१८५२) आणि पूना असोसिएशन (१८६७) या संस्था स्थापन झाल्या होत्या. पुढे १८७० मध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर (२ एप्रिल १८७०) ‘पुणे सार्वजनिक सभा’ या संस्थेची स्थापना झाली.

maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
selection process for next chief election commissioner
अन्वयार्थ : सरकारी खातेच जणू…
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
Pushkar Singh Dhami
Uttarakhand : डेहराडूनमध्ये ५७ बेकायदेशीर मदरसे, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी उचललं मोठं पाऊल; घेतला ‘हा’ निर्णय
Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : वसा साने गुरुजींच्या विचारांच्या प्रसाराचा,राष्ट्र घडविण्याचा

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे १८७१च्या नोव्हेंबरमध्ये पुण्यात आले होते. त्या वेळी पुणे सार्वजनिक सभा ही एकच नाव घेण्याजोगी संस्था पुण्यात होती. पेशवाईच्या अस्तानंतर थंड पडलेल्या महाराष्ट्रात चैतन्य आणण्यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी सार्वजनिक सभेचे जनक गणेश वासुदेव जोशी यांच्याशी परिचय करून घेत सभेची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यामुळे विचार न्यायमूर्ती रानडे यांचा आणि कृती सार्वजनिक काका यांची असे एक समीकरण पुण्याच्या सार्वजनिक जीवनात तयार झाले होते. सभेच्या त्या काळातील कार्यामुळे सभेला आणि जोशी यांना इतकी लोकप्रियता लाभली की जोशी हे सार्वजनिक काका या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. सार्वजनिक काका यांच्या अथक परिश्रमाने आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सहकार्याने न्यायमूर्ती रानडे यांनी पुणे सार्वजनिक सभेला स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले. इंग्रज सरकारला पुणे सार्वजनिक सभेच्या मताची दखल घ्यावी लागे. एवढे महत्त्व सभेने निर्माण केले होते.

सातारा येथे स्थलांतरित झालेल्या जोशी कुटुंबामध्ये गणेश वासुदेव जोशी यांचा २० जुलै १८२८ रोजी जन्म झाला. ते लहान असतानाच पितृछत्र हरपले. मुलांचे संगोपन आणि शिक्षणासाठी त्यांच्या आई साताऱ्यातच राहिल्या. वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे १८४८ मध्ये गणेश जोशी पुण्याला आले. त्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात केली. न्यायालयामध्ये कारकून म्हणून त्यांना नोकरी मिळाली. ते शिरस्तेदार म्हणजेच प्रमुख कारकून पदापर्यंत पोहोचले. त्यांचा निस्पृहपणा इतरांना अडचणीचा ठरल्यामुळे पैशांचा अपहार केल्याचा आरोप ठेवून त्यांना नोकरीतून तात्पुरते बाजूला करण्यात आले. पुढे ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांना पुन्हा रुजू होण्यास सांगण्यात आले. स्वाभिमानी वृत्तीच्या काकांना हे मान्य झाले नाही आणि त्यांनी सरकारी नोकरीला कायमचा रामराम ठोकला. त्यानंतर वकिलीचा अभ्यास करून ते १८६१ मध्ये वकील झाले.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा, वृद्धांचा निवारा

पुण्यात दहशतीचे वातावरण असताना, १८७८-७९ मध्ये बंड पुकारून देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करण्यास्तव सिद्ध झालेले आद्या क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची वकिली करण्यासाठी काका निर्भीडपणे पुढे आले. पर्वती देवस्थानच्या गैरकारभार प्रकरणात काकांनी पुणेकरांची वकिली स्वीकारली. हा गैरकारभार लोकांच्या नजरेस आणून द्यावा या हेतूने काकांनी १४ मार्च १८६९ रोजी पुण्यातील लोकांची सभा बोलाविली. केवळ हाच एक उद्देश नाही तर, रयतेची गाऱ्हाणी सरकारदरबारी मांडण्यासाठी एक व्यापक सभेची स्थापना व्हावी असा निर्णय झाला. ‘पुणे सार्वजनिक सभा’ या नावाने वर्ष प्रतिपदेच्या मुहूर्तावर २ एप्रिल १८७० रोजी स्थापन झालेल्या सभेचे सार्वजनिक काका संस्थापक कार्यवाह होते. श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी हे सभेचे पहिले अध्यक्ष होते.

स्वदेशी वापरासंदर्भात १८७२ च्या डिसेंबरमध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या झालेल्या भाषणाचा काकांवर इतका प्रभाव पडला की स्वदेशी वस्तू वापरण्याचे व्रत त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पाळले. सार्वजनिक काका आणि रावबहादूर सदाशिवराव गोवंडे यांच्या प्रोत्सहनाने या दोघांच्या सहचारिणींनी १८७३ मध्ये ‘स्त्री विचारवती सभे’ची स्थापना केली. या सभेने पुण्यात ‘सार्वजनिक हळदीकुंकू’ आयोजित केले. सर्व जातींमधील स्त्रियांसाठी एकत्रितपणे साजरे होणारे हे पहिलेच हळदीकुंकू होते. समारंभास पाच हजार महिला जमल्या होत्या आणि शंभर रुपये खर्च आला.

जून १८८० च्या पावसाळ्यात काका आजारी पडले. न्यूमोनियाचे निमित्त होऊन २५ जुलै १८८० रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सार्वजनिक काका यांच्या कार्याचे स्मरण करण्याच्या उद्देशातून पुणे महापालिकेच्या वतीने बाजीराव रस्त्यावरील ‘नवा विष्णू मंदिरा’च्या परिसरातील चौकामध्येच त्यांचा अर्धपुतळा बसविला आहे. सार्वजनिक काकांच्या निधनानंतरही पुणे सार्वजनिक सभा नेटाने काम करत राहिली. साहित्यसम्राट न. चिं. केळकर, लोकमान्य टिळक, शि. म. परांजपे, ल. ब. भोपटकर, दा. वि. गोखले, गणपतराव नलावडे, न. गो. अभ्यंकर, पोपटलाल शहा, पु. वि. डावरे, पु. ग. मोडक, अ. ग. आळेकर, स. रं. अधिकारी, मीरा पावगी, ग. श्री. निसळ यांनी गेल्या दीडशे वर्षांत संस्थेमध्ये योगदान दिले आहे. सध्या विद्याधर नारगोलकर हे संस्थेचे अध्यक्ष असून अनिल शिदोरे कार्याध्यक्ष आहेत.

दीडशे वर्षांच्या इतिहासाचा स्मृतिगंध संस्थेने कागदपत्रांच्या रूपाने जतन केला आहे. सार्वजनिक काका, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, शि. म. परांजपे, हरी नारायण आपटे, लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार अशा त्या काळातील थोर व्यक्तींच्या मराठी, इंग्रजी आणि मोडी लिपीमधील स्वाक्षरी असलेली तसेच अन्य संदर्भपत्रे हा अमूल्य खजिना संस्थेच्या संग्रहामध्ये आहे. दीड शतकांमध्ये ही कागदपत्रे जीर्ण झाली आहेत. डिजिटीकरणाच्या माध्यमातून हा ठेवा जतन करण्याचा संस्थेचा संकल्प असून त्यासाठी समाजाच्या दातृत्वाची आवश्यकता आहे. बुधवार पेठ येथील संस्थेच्या वास्तूपर्यंत पोहोचणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नवी वास्तू साकारण्याचा संस्थेच्या मानस असून त्या दृष्टीने जागेचा शोध सुरू आहे. यासंदर्भात सभासदांची मते जाणून घेतली असून कार्यालय स्थलांतर करण्याच्या प्रस्तावाला सर्वांनी मान्यता दिली आहे. दीडशे वर्षे पार केलेल्या संस्थेने स्वत:चे संकेतस्थळ विकसित केले आहे. संस्थेकडे असलेली अनमोल कागदपत्रे अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये आहेत. या अमूल्य दस्तावेजांचे डिजिटीकरणाच्या माध्यमातून जतन करण्यासाठी संस्थेने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, ही प्रचंड खर्चीक बाब असून त्यासाठी संस्थेला आर्थिक साहाय्याची आवश्यकता आहे, असे संस्थेचे अध्यक्ष विद्याधर नारगोलकर यांनी सांगितले.

संस्थेचे कार्यालय पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून त्याला अर्थसाह्याची निकड भासत आहे. तसेच संस्थेच्या संग्रहातील अमूल्य कागदपत्रांचे काळानुरूप डिजिटीकरण करून जतन करण्याच्या संकल्पसिद्धीसाठी निधीची गरज आहे. सध्याच्या कागदविरहीत युगामध्ये संस्थेला आधुनिकीकरणाची कास धरण्यासाठी निधीची आणि तंत्रकुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. याच्या जोडीला संस्थेचे वाचनालय आणि अभ्यासिका सुरू करण्याचा मानस आहे. पुणे शहराच्या बौद्धिक वैभवाचे संवर्धन करणाऱ्या या संस्थेला समाजाने आर्थिक आधार देण्याची गरज आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल

पुणे सार्वजनिक सभा. छत्रपती शिवाजी रस्त्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथून पुढे लक्ष्मी रस्त्यावर बेलबाग चौकात यावे. तेथून डाव्या हाताला सिटी पोस्ट येथून विजय मारुती चौकात उजवीकडे वळल्यानंतर उजव्या हाताला तिसऱ्या इमारतीमध्ये पुणे सार्वजनिक सभेचे कार्यालय आहे.

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. 

संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.

पुणे सार्वजनिक सभा

PUNE SARVAJANIK SABHA

ऑनलाइन देणगीसाठी तपशील

बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, शाखा कसबा पेठ, पुणे

●खाते क्रमांक : 0151001016375

●आयएफएससी कोड : COSB0000015

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

धनादेश येथे पाठवा…

पुणे कार्यालय

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५

दिल्ली कार्यालय

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००

नागपूर कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

महापे कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय

संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मेन्शन, तनिष्क शोरूमच्या वरती, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. दूरध्वनी क्रमांक – २५३८५१३२

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०

Story img Loader