पुणे : पुण्याच्या संस्थात्मक वैभवामध्ये भर घालत वैचारिक भरणपोषण करून समाजभान जागे ठेवण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारी ‘पुणे सार्वजनिक सभा’ ही संस्था कात टाकण्यासाठी सज्ज झाली असून तब्बल दीड शतकांच्या अमूल्य दस्तावेजांना आधुनिकीकरणाचा साज देण्यासाठी उत्सुक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाला संघटित करण्यासाठी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वराज्याचे सुराज्यामध्ये रूपांतर करण्यासाठी आणि आधुनिक काळात देशाला महासत्ता करण्याचे स्वप्न सत्यामध्ये उतरविण्यासाठी गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांनी स्थापन केलेली पुणे सार्वजनिक सभा आपल्या परीने योगदान देत खारीचा वाटा उचलत आहे. तीन शतकांचा दुवा सांधणारी पुणे सार्वजनिक सभा ही संस्था नव्या वास्तूसह अनमोल अशा दस्तावेजांचे डिजिटीकरणाच्या माध्यमातून जतन करण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र, त्यासाठी संस्थेला आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा