आम्ही आपल्या परीने काम करतच आहोत. पण, ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाने आम्हाला केवळ प्रसिद्धीच दिली नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातील सामान्यजनांकडून लाभलेल्या अर्थपूर्ण साह्याने कामाची ऊर्मी वाढली असून लढण्याला बळ मिळाले… ही भावना आहे राज्याच्या विविध भागांत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची.

हेही वाचा >>>पुणे: वाहतूक कोंडीला मेट्रो जबाबदार?; महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यातील निष्कर्ष

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत
Maharashtra Assembly Elections 2024 Narendra Modi BJP MVA
‘गुजरात मॉडेल’चा महाराष्ट्रात पायरव…
loksatta editorial on challenges for devendra fadnavis as maharashtra cm
अग्रलेख : आल्यानंतरचे आव्हान!
eknath shinde group upset over bawankule tweet on new maharashtra cm oath taking ceremony date
धुसफूस सुरूच; शपथविधीबाबत बावनकुळेंच्या घोषणेवर शिंदे गटातून नाराजीचा सूर

‘लोकसत्ता’च्या वतीने गणेशोत्सवात राबविण्यात आलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमामध्ये निवड झालेल्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना नागरिकांकडून आलेल्या पहिल्या टप्प्यातील धनादेशांचे वितरण करण्यात आले. काॅसमाॅस को-ऑप. बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक अविनाश राणा यांच्या हस्ते कोल्हापूर येथील ‘अवनी’ संस्थेच्या अनुराधा भोसले आणि ज्ञानदेव माने, कराड येथील ’डाॅ. कल्पना चावला विज्ञान केंद्रा‘चे डाॅ. संजय पुजारी आणि तुषार साळुंके, बीड येथील ‘निर्मिती प्रतिष्ठान’चे सुरेश राजहंस आणि पिंपरी-चिंचवड येथील ‘रिअल लाईफ रिअल पीपल्स’ संस्थेचे एम. ए. हुसेन आणि प्रकाश पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आले. ’लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम आणि वरिष्ठ महाव्यवस्थापक (विपणन) सारंग पाटील या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे: ‘यूजीसी’ प्रादेशिक कार्यालय बंद करण्याला विरोध

‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमामध्ये संस्थेला प्रसिद्धीबरोबरच अर्थबळही लाभले. करोनाच्या दोन वर्षांनंतर संस्थेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली, अशी भावना व्यक्त करताना डाॅ. संजय पुजारी यांचा कंठ दाटून आला होता. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे बेवारस आणि गरजू व्यक्तींना सेवा देण्याच्या माझ्या कार्याला ‘लोकसत्ता’ने राज्यभरात पोहोचवून मला ओळख मिळवून दिली. ऑेंकारेश्वर मंदिराजवळ पेनविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मला त्या इमारतीतील काॅसमाॅस बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हस्ते धनादेश स्वीकाण्याचे भाग्य लाभले, असे हुसेन यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.

हेही वाचा >>>पुणे: वाहतूक कोंडीला मेट्रो जबाबदार?; महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यातील निष्कर्ष

‘लोकसत्ता’च्या ’चतुरंग’ पुरवणीमध्ये ‘शिक्षणाचा तमाशा’ हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर तमाशा कलावंतांच्या मुलांच्या संगोपन, शिक्षण आणि पुनर्वसनाचा प्रश्न महाराष्ट्राच्या पटलावर आला. आम्ही काम सुरू करेपर्यंत हा प्रश्न गंभीर आहे हेच कोणालाही ठाऊक नव्हते, असे सुरेश राजहंस यांनी सांगितले. वीटभट्टी, ऊसतोड कामगारांच्या ७० हजार मुलांपैकी आम्ही केवळ आठ ते नऊ हजार मुलांपर्यंत पोहोचू शकतो. ‘लोकसत्ता‘ने आमच्या कार्याला प्रसिद्धी दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि या मुलांना शाळेत दाखल करून घेऊ, असे आश्वासन दिले असल्याचे अनुराधा भोसले यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे: पोलीस ठाण्यामध्ये येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने वागा ; पोलीस महासंचालकांचे आदेश

‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमामध्ये प्रसिद्धी लाभलेल्या सर्व संस्थांचे कार्य कौतुकास्पद असून या उपक्रमामध्ये काॅसमाॅस बँकेला सहभागी करून घेतले याबद्दल अविनाश राणा यांनी ‘लोकसत्ता’विषयी कृतज्ञता व्यक्त केली. बँकेच्या प्रगतीची माहिती देत राणा यांनी या उपक्रमातील सर्व संस्थांचा स्नेहमेळावा घेण्याचे वचन दिले.

दानयज्ञ अजूनही सुरू
‘लोकसत्ता’च्या वतीने गणेशोत्सवात राबविण्यात आलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमामध्ये निवड झालेल्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना नागरिकांकडून आलेल्या पहिल्या टप्प्यातील धनादेशांचे वितरण करण्यात आले असले तरी हा दानयज्ञ असूनही सुरू आहे. ज्या व्यक्तींना या संस्थांना अर्थसाह्य करण्याची इच्छा आहे त्यांनी संस्थांच्या नावाने धनादेश पाठवावेत.

Story img Loader