पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयाची नाहक होणारी बदनामी तातडीने थांबवावी, या मागणीसाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ससूनमधील डॉक्टर, परिचारिकांसह कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

मागील काही काळात ससूनमध्ये गैरप्रकार घडले. यामध्ये काही मोजक्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असताना संपूर्ण रुग्णालयाची बदनामी केली जात आहे, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएशन, लिपिक परिचारिका ससून रुग्णालय शाखा, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, बहुजन अधिकारी कर्मचारी संघटना, सर्व मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, समाजसेवा अधीक्षक कार्यालय, राज्य सरकारी गट-ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या संघटनांचे कर्मचारी मोर्चात सहभागी झाले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला आणि तिथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?
Eknath Shinde, Naresh Mhaske,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कर्णधार – खासदार नरेश म्हस्के

हेही वाचा…नितेश राणेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निवृत्त पोलिसांची निदर्शने; जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्यालयासमोर आंदोलन

काही संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार ससूनची बदनामी होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे, की रुग्णालयाची बदनामी करताना येथे काम करीत असलेल्या पाच हजार कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. रुग्णालयात क्षमतेपक्षा जास्त रुग्ण असूनही पदभरती होत नाही. विविध संघटना आणि लोकप्रतिनिधी समस्या सोडविण्यापेक्षा सरकारी कामात अडथळा आणत आहेत. काही संघटना डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत. त्यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा होणारा त्रास थांबवावा.

हेही वाचा…एमपीएससीची उद्या बैठक, कृषि सेवेच्या २५८ पदांबाबत काय होणार निर्णय?

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

-रुग्णालयात नियमबाह्य शक्तींना आळा घालणे.
-वर्ग-ड च्या कर्मचाऱ्यांची भरती सरळ सेवेने करावी.

-ठेकेदारी पद्धत, खासगीकरण, कंत्राटीकरण रद्द व्हावे.
-कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बाहेरील संघटनांना मज्जाव करावा.

-रुग्णांना औषधे व वैद्यकीय साधने मोफत उपलब्ध करून द्यावीत.