पुणे : राज्यातील अनेक गरजू रुग्णांना अद्ययावत उपचार देणारे प्रमुख सरकारी रुग्णालय असा लौकिक असलेल्या ससून सर्वोपचार रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अधिष्ठाता पदाची जबाबदारी सांभाळत असलेले डॉ. विनायक काळे यांच्याकडे रुग्णालयातील मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
डॉ. संजीव ठाकूर हे आतापर्यंत सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. तेथील पदभार डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे सोपवून बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
First published on: 15-01-2023 at 12:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sassoon hospital post responsibility sanjeev thakur pune print news bbb 19 ysh