ससून रुग्णालयात सलाइन आणि इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वस्तूंच्या पुरवठादारांकडून पुरवठा होण्यास वेळ लागल्यामुळे रुग्णालयातर्फे पिंपरी-चिचवड पालिकेकडे सलाइन तसेच इंजेक्शनच्या एकूण दहा हजार बाटल्यांची मागणी करण्यात आली आहे.
यात ‘आयव्ही नॉर्मल सलाइन’ तसेच ‘आयव्ही मेट्रोनिडॅझोल’ या इंजेक्शनच्या प्रत्येकी पाच हजार बाटल्यांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेने रुग्णालयास या वस्तू पुरवण्याचे मान्य केले आहे.  सध्या रुग्णालयात सलाइनचा तुटवडा नसल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डी. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘सलाइन पुरवठादारांनी पुरवठा न केल्यामुळे काही दिवसांनी रुग्णालयात सलाइनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी ही पर्यायी सोय करण्यात आली आहे. सलाइनची ही मागणी कर्ज तत्त्वावर करण्यात आली आहे. सलाइन व औषधांचा तुटवडा भासल्यास रुग्णालय स्थानिक पातळीवरील पुरवठादारांकडून या वस्तू खरेदी करते. मात्र सध्या सलाइनसाठी स्थानिक पुवठादारांकडून खरेदी करण्यात आलेली नाही.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा