बसथांब्यांमधील स्वयंचलित दरवाजे, आगार व बसथांब्यांची कामे अपूर्ण; जलदगती प्रवासासाठी प्रतीक्षा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : कोटय़वधी रुपये खर्च करूनही सातारा रस्ता बीआरटी मार्गाच्या पुनर्रचनेची कामे अपूर्णच असल्यामुळे हा मार्ग पुढील काही महिने प्रवासी सेवेसाठी बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सातारा रस्ता बीआरटी मार्गातील बसथांब्यामधील स्वयंचलित दरवाजे, स्वारगेट आणि कात्रज येथील आगार आणि बसथांब्यांची कामे अपूर्ण आहेत. स्वारगेट परिसरात अतिक्रमणांमुळे बीआरटी सेवेतील गाडय़ाही सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अडचणी दूर झाल्यानंतरच बीआरटी मार्ग सुरू करता येईल, अशी स्पष्ट भूमिका पीएमपी प्रशासनाने घेतली आहे. कोटय़वधी रुपये खर्च करूनही कामे अपूर्णच असल्याचे आणि जलदगती प्रवासासाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखीत झाले आहे.

स्वारगेट-कात्रज या सातारा बीआरटी मार्गाची नगर रस्त्यावरील ‘रेनबो बीआरटी’च्या धर्तीवर पुनर्रचना करण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. कामे रखडली असल्यामुळे बीआरटी मार्ग के व्हा सुरू होणार, याबाबत सातत्याने विचारणा होत आहे. मात्र विविध अडचणींमुळे तूर्त या मार्गावर बीआरटी सेवा  सुरू होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. सध्या स्वारगेट परिसरात मेट्रोच्या बहुउद्देशीय वाहतूक के ंद्राच्या कामाबरोबरच भुयारी मार्गाचे आणि पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही कामे जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत स्वारगेपटपासून बीआरटीमधून गाडय़ा धावू शकणार नाहीत. याशिवाय स्वारगेट-कात्रज या ५. ६ किलोमीटर अंतरातील बसथांब्यांची कामेही रखडली आहेत. थांब्यांना स्वयंलचित दरवाजे बसविण्यात आलेले नाहीत. थांब्यावरील इलेक्ट्रिकल यंत्रणाही कार्यान्वित झालेली नाही. ही कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच स्वारगेट परिसरातील अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत.  ती झाल्याशिवाय बीआरटी मार्गावरील सेवा सुरू करता येणार नाही, असे पत्र पीएमपी प्रशासनाकडून महापालिके ला देण्यात आले आहे. महापालिके ने मात्र कामे पूर्ण झाल्याचा दावा के ला आहे. मात्र यापूर्वी रखडलेली कामे पहाता  बीआरटी मार्ग सुरू होण्याबाबत संदिग्धताच आहे.

सातारा रस्ता वाहतुकीसाठी कमी पडत असल्यामुळे जलद गती बससेवेअंतर्गत (बस रॅपिड ट्रान्झिट- बीआरटी) सेवा रस्ते, पदपथ हटवून रस्त्याची पुनर्रचना करण्यासाठी महापालिके ने ७५ कोटींचा खर्च के ला आहे. तर कात्रज ते हडपसर हा मूळ मार्ग उभारण्यासाठी १०० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. त्यानंतरही पदपथांचे विकसन, सायकल मार्ग उभारण्यासाठी २३ कोटी रुपये तर बीआरटी मार्गाचे लेखापरीक्षण करण्यासाठी १६ लाख रुपयांच्या खर्चालाही यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. एवढा खर्च करूनही बीआरटीचे रडगाणे मात्र कायम राहिले आहे.

अडचणी कोणत्या?

सातारा रस्त्यावरील पदपथ आणि सेवा रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहने लावण्याचे प्रकार सर्रास वाढत आहेत. त्यातून वाहतुकीला अडथळा होत आहे. सध्या बीआरटी मार्ग सर्व वाहनांसाठी खुली करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीबाबत गोंधळाची परिस्थिती आहे.  मेट्रोच्या कामामुळेही बीआरटी मार्ग सुरू करण्यातील अडचणी वाढल्या आहेत. झेब्रा क्रॉसिंग, बसथांबे, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना, सिग्नल यंत्रणेबाबतही प्रश्नचिन्ह आहे. या कामांचे लेखापरीक्षण करण्यासाठी पर्व आयआयटीला काम देण्याचा प्रस्ताव आहे.

बीआरटी मार्गावरील सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने पीएमपीकडे गाडय़ा आहेत. मात्र बसस्थानकांवर स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आलेले नाहीत. स्वारगेट, कात्रज बसस्थानकांचे कामही अपूर्ण आहे. थांब्यावर इलेक्ट्रिकल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. त्याबाबत पालिके शी पत्रव्यवहार करण्यात आला असून पाहणी दौराही के ला आहे.

– डॉ. राजेंद्र जगताप, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी