क्रेडाई महाराष्ट्रच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत क्रेडाई महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी मगरपट्टा सिटीचे अध्यक्ष सतीश मगर यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. तसेच क्रेडाई महाराष्ट्रच्या पुणे विभागाच्या उपाध्यक्षपदी शांतीलाल कटारिया, प्रदीप पिंपळकर(सोलापूर विभाग), अनंत राजेगावकर(नाशिक विभाग), प्रशांत सरोदे (नागपूर विभाग), आणि प्रदीप खैरनार(औरंगाबाद विभाग) यांची नियुक्त करण्यात आली. अमित इंटरप्रायजेसचे किशोर पाटे यांची क्रेडाई महाराष्ट्रच्या चिटणीसपदी व बी. यू. भंडारी लॅन्डमार्कचे अनुज भंडारी यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. क्रेडाईचे अध्यक्षपद भूषविण्याचे मगर यांचे हे दुसरे वर्ष आहे. बांधकाम मजुरांसाठी विविध आरोग्य शिबिरे, बँकांमध्ये खाते व डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध करून देणे अशी अनेक कामे मगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहेत. 

Story img Loader