तळेगांव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ता सतीश शेट्टी खूनप्रकरणात अटक करण्यात आलेले निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर आणि तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक नामदेव सुखदेव कवठाळे यांना शनिवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
माहिती अधिकार कार्यकर्ता सतीश शेट्टी यांचा १३ जानेवारी २०१० रोजी तळेगांव दाभाडे येथे भरदिवसा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. शेट्टी खूनप्रकरणाचा तपास सुरुवातीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे होता. त्यावेळी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर आणि सहायक निरीक्षक कवठाळे हे या गुन्ह्य़ाचा तपास करत होते. या तपासात कवठाळे यांनी प्रमुख आरोपींना वाचविण्यासाठी मदत केली तसेच बनावट पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तयार केल्याचे निष्पन्न झाले.
आणखी वाचा