पुणे : हडपसर येथील भाजपचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून काल सकाळी पहाटेच्या सुमारास तीन ते चार जणांनी चारचाकी वाहनातून अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतीश वाघ यांचा काल मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.
हेही वाचा – भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…
हेही वाचा – नारायण पेठ पोलीस चौकीसमोर ज्येष्ठाचा मोबाइल चोरीला
या घटनेप्रकरणी अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील म्हणाले की, सतीश वाघ यांच्या हत्येच्या घटनेची पुणे पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना झाली आहेत. तसेच तात्रिक माध्यमातून देखील तपास सुरू आहे. कोणत्या कारणातून सतीश वाघ यांची हत्या झाली, हे सांगता येणार नाही. त्याचबरोबर सतिश वाघ यांना उचलल्यानंतर काही वेळात मारले असल्याचा प्राथमिक अंदाज असून बंदुकीचा वापर केल्याचे दिसत नाही. तीक्ष्ण हत्याराने मारल्याची शक्यता आहे आणि या प्रकरणातील आरोपी सायंकाळपर्यंत ताब्यात येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.