पुणे : भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी आणखी एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. वाघ यांचा खून केल्यानंतर आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. आतिश जाधव असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जाधवला धाराशिव येथून गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सतीश वाघ यांचे अपहरण करुन त्यांचा ऊरळी कांचन भागातील शिंदेवणे घाटात खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी पवन शर्मा (रा. धुळे ) आणि नवनाथ गुरळ (रा. फुरसुंगी ) यांना अटक केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुणेकरांचा आंतरराष्ट्रीय विमान प्रवास झाला सुखकर, काय आहेत नवीन बदल ?

वाघ यांच्या खून प्रकरणात पसार झालेला आरोपी आतिश जाधवचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. तो धाराशिव परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. सतीश वाघ हे ९ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास फुरसुंगी परिसरातून निघाले होते. आर्थिक वादातून वाघ यांचे अपहरण करुन आरोपींनी त्यांचा खून करण्यात आला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satish wagh murder case another one accused arrested pune print news rbk 25 css