पुणे : हडपसर येथील भाजपचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून काल सकाळी पहाटेच्या सुमारास पाच जणांनी चारचाकी वाहनातून अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतीश वाघ यांचा काल मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या मामाची हत्या होऊन २४ तास उलटून देखील आरोपींचा शोध लागत नव्हता. यामुळे सत्ताधारी पक्षावर टीका होऊ लागली होती. त्याच दरम्यान या प्रकरणी पुणे पोलिसांनी १६ पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केल्या होत्या. त्याच दरम्यान एका आरोपीला पुणे पोलिसांनी वाघोली येथून ताब्यात घेतले असून त्या आरोपीकडे पोलिस चौकशी करीत आहे.

हेही वाचा – वानवा.. स्वच्छतागृहांची

firing incident Gurudwara area ​​Nanded morning gate
नांदेड पुन्हा गोळीबाराने हादरले, एकाचा मृत्यू, गुरुद्वारा गेट क्र.६ भागातील घटना
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
attempt of murder wagholi pune five arrested crime news
वैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण करुन खुनाचा प्रयत्न, वाघोलीतील घटना; पाच जण अटकेत
twist in Akshay Shinde case, Badlapur sexual assault Accused shinde parents demand to mumbai high court for closure of case
अक्षय शिंदे प्रकरणात नवे वळण : प्रकरण पुढे लढायचे नाही, ते बंद करा, आरोपी अक्षय शिंदे याच्या आईवडिलांची उच्च न्यायालयात मागणी
pune koyta attack news
पुणे : बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध आणखी एक गु्न्हा, तरुणावर कोयत्याने वार
Shirdi double murder news in marathi
शिर्डीत साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; एक जखमी ; लुटमारीचा संशय, संशयीत ताब्यात
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव

हेही वाचा – मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …

आरोपीला शोधण्यासाठी १६ पथके रवाना : अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील

सतीश वाघ हे काल पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करीत असताना चारचाकी वाहनातून आलेल्या तीन चार जणांनी त्यांना गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून घेऊन गेले. ही घटना एका व्यक्तीने पहिली आणि त्यानंतर या घटनेची तक्रार वाघ यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केली. त्यानुसार आम्ही अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर विविध भागांत पथके रवाना करण्यात आली. मात्र काल सायंकाळच्या सुमारास सतीश वाघ यांचा मृतदेह यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला. तसेच आरोपींच्या शोधासाठी १६ पथके रवाना केल्या आहेत. या प्रकरणी आम्ही तांत्रिक दृष्ट्या देखील शोध घेत आहे. त्याचबरोबर सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी काही तासात तीक्ष्ण हत्याराने मारल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. या एकूणच घटनेची पुणे पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून ही हत्या कोणत्या कारणास्तव करण्यात आली हे अद्यापपर्यंत समजू शकले नाही. या प्रकरणातील आरोपी सायंकाळपर्यंत ताब्यात येण्याची शक्यता आहे.

४०० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण; २० पथकांकडून तपास

टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हडपसर पोलीस ठाण्यास भेट घेऊन तपासाबाबत सूचना दिल्या. गुन्हे शाखेच्या २० पथकांकडून तपास सुरू करण्यात आला. हडपसर, फुरसुंगी, सोलापूर रस्ता परिसरातील ४०० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोेलिसांनी तपासले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास सुरू करण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पसार झालेल्या एक आरोपी सराइत गुन्हेगार असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

हेही वाचा : समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत

पुणेकरांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य-पोलीस आयुक्त

‘आरोपींनी सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर काही मिनीटांत त्यांचा धावत्या मोटारीत खून केला आहे. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पोलिसांनी अपहरणानंतर काही वेळात ४०० ठिकाणाचे सीसीटीव्ही चित्रीकरणाचा विदा मिळवला. मोटारीवर वाहन क्रमांकाची पाटी नव्हती. वाहन क्रमांक नसलेल्या वाहनांची माहिती मिळवण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. अपहरण झाल्यानंतर काही धागेदारे मिळाले होते. अपहरणकर्त्यांनी खंडणी किंवा कोणतीही मागणी केली नव्हती,’ असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. ‘पुणेकरांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. अपहरणासारख्या गंभीर घटना रोखण्यासाठी पोलीस युद्धपातळीवर तपास करतात’, असे त्यांनी नमूद केले.

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. वाघ यांच्या खूनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. तपासात याबाबतची माहिती मिळेल.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

Story img Loader