काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी स्वा.सावरकर यांच्याबद्दल भारत जोडो यात्रेत वादग्रस्त विधान केल्याने राज्यातील भाजपासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील सारसबाग येथील सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हिंदू महासंघाचे आनंद दवे आणि स्वा.सावरकर यांच्या कुटुंबातील सदस्य सात्यकी सावरकर यांनी स्वा. सावरकर यांच्या पुतळ्यावर गुलाब जलाने अभिषेक केला. यावेळी सामुदायिक सावरकर गीत देखील पठण केले.

हेही वाचा- राहुल गांधींकडून समाजात फूट पाडण्याचे काम; रामदास आठवले यांची टीका

यावेळी सात्यकी सावरकर म्हणाले की, राहुल गांधी यांची भारत जोडो देशातील अनेक भागातून गेली आहे. मात्र त्यावेळी राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारे विधान केले नाही. पण महाराष्ट्रामध्येच आल्यावर त्यांनी सावरकर यांच्याबदल केलेल विधान हे जाणीवपूर्वक केल्याच स्पष्टपणे दिसत आहे. तसेच राहुल गांधी यांनी पहिल्यांदा सावरकर यांच्याबद्दल विधान केले होते. त्यावेळी रणजित सावरकर यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या गोष्टीला थोडा वेळ लागतो. मात्र जे खरं आहे. त्याचाच विजय होतो. वेळ लागू द्या, पण आज जे झाकोळून ठेवल आहे. ते पण राहु द्या, पण ते कधी तरी बाहेर पडणार असून शेवटी सावरकरांचाच विजय होणार असल्याचे सात्यकी म्हणाले.

हेही वाचा- राहुल गांधी यांच्या निषेधार्थ मनसेकडून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या नेत्यांनी देखील सावरकर यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहे. हे विरोधक असूनदेखील सावरकर यांना मानसन्मान देत असतील आणि आता राहुल गांधी सारखे तोडळ पुढारी सावरकर यांच्यावर चिखल फेक करीत असतील. हे त्यांच्या नेत्यांना पटणार नसल्याचेही सात्यकी सावरकर म्हणाले.

हेही वाचा- पुणे: वैद्यकीय महाविद्यालय उभारणीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

स्वा.सावकार यांना भारतरत्न मिळवा, अशी मागणी शिवसेनेकडून सातत्याने करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील मागील सरकारमधील महाविकास आघाडीमधील ठाकरे गट राहुल गांधी यांच्या विधानामुळे दुखावला गेला आहे. तसेच राहुल गांधी यांच्या विधानामुळे अनेक जण दुखावले गेले असून आता काँग्रेसची याच विधानामुळे राजकीय हानी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.