पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या शहर आणि ग्रामीण भागातील विधानसभा निवडणूक इच्छुकांनी मुलाखतींवेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. विशेषत: ग्रामीण भागातील इच्छुकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांतील ४१ आणि ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघांतील ३७ अशा एकूण ७८ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

जुन्नरचे काँग्रेसचे नेते, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे जुन्नरचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून त्यांनी इच्छुक म्हणून मुलाखत दिली असून कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढविण्यास तयार असल्याचा दावा शेरकर यांनी केला. त्यामुळे जुन्नरची लढत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार अतुल बेनके विरोधात सत्यशील शेरकर अशी होण्याची शक्यता आहे.

Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Sharad Pawar on ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
sharad pawar road show chinchwad assembly constituency rahul kalate
भाजपच्या चिंचवडच्या गडात शरद पवार यांचा पहिल्यांदाच रोड-शो; नागरिकांचा प्रतिसाद
Chhagan Bhujbal alleges Sharad Pawar who broke the Shiv Sena in 1991
१९९१ मध्ये शरद पवार यांनीच शिवसेना फोडली; छगन भुजबळ यांचा आरोप
Fear of division in Teli community due to the candidates given by sharad pawar and ajit pawar
पवार काका पुतण्यांनी दिलेल्या उमेदवारांमुळे तेली समाजात फूट पडण्याची भीती
Ajit Pawar Questionnise the voters of Baramati about the retirement of Sharad Pawar Pune print news
शरद पवारांंच्या निवृत्तीनंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार यांची बारामतीतील मतदारांना विचारणा
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !

जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून बेनके शरद पवार यांच्या संपर्कात होते. त्यामुळे बेनके राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा जुन्नर तालुक्यात सुरू झाली होती. बेनके यांना पक्षात घेऊन शरद पवार अजित पवार यांना धक्का देतील, अशी शक्यताही व्यक्त होत होती.

हेही वाचा >>>शेती शेतकऱ्यांच्या नव्हे व्यापारी, विक्रेत्यांच्या फायद्याची ? जाणून घ्या, रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अहवालातील धक्कादायक माहिती

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात जुन्नर मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत शरद पवार विरोधात अजित पवार गट अशीच होणार आहे. शेरकर काँग्रेसचे नेते असून जुन्नरमधून निवडणूक लढविण्यास ते इच्छुक आहेत. त्यानुसार त्यांनी बुधवारी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारीसाठी मुलाखत दिली.

हेही वाचा >>>अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र; जाणून घ्या किनारपट्टी, पश्चिम घाटासाठीचा अंदाज

‘महाविकास आघाडी मला संधी देईल. कोणत्याही चिन्हावर मी निवडणूक लढविण्यास तयार आहे,’ असे शेरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे शेरकर हेच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार असतील, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसात भाजप नेते हर्षवर्धन पाटील, समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे रामराजे निंबाळकरही येत्या काही दिवसात या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.