‘‘नमस्कार, संवाद हेल्पलाईनमधून बोलतो आहोत “
संवाद हेल्पलाईन  का ?
‘‘हो ! आपला फोन संवाद एचआयव्ही / एड्स हेल्पलाईनमध्ये लागलेला आहे. आपण मिस्ड कॉल दिला होता ना, बोला आपणास काय माहिती हवी आहे.‘
मला एचआयव्ही झाला आहे असं दवाखान्यात सांगितलं. मला काही समजत नाही काय करावं ते. दवाखान्यात तुमचा नंबर दिला व्हता ते म्हणाले, इथं मिस्ड कॉल करा, सगळी माहिती तुमचं नाव न सांगता दिली जाते. मला तुमच्याशी लय बोलायचं हाय मनातल्या लयी घुसमटी हायती त्या सांगायच्या हाय.’’
हे संभाषण आहे ‘संवाद हेल्पलाईन’कडे आलेल्या एका एचआयव्ही संक्रमित महिलेचे. यासारखे असंख्य प्रश्न, शंका, व्यथा घेऊन अनेक व्यक्ती हेल्पलाईनकडे दूरध्वनी करीत असतात. एचआयव्हीचा रिपोर्ट हातात मिळाला की पायाखालून जमीन सरकली, विश्व संपले, आयुष्य कसे जगणार? आता पुढे काय होणार? मुलांचे काय? कुटुंबाचे काय? आता मरणच? वैवाहिक जोडीदार कसा मिळणार यासारख्या असंख्य प्रश्नांचा गोधळ निर्माण होतो. या सोबतच असते चिंता, राग, चीड-चिड, अपराधीपणा, रिपोर्ट विषयाची अस्वीकार्यता, जोडीदाराविषयी द्वेश, क्रूरतेची भावना, बदला घेण्याबाबतचा विचार यासारख्या अनेक भावना मनामध्ये निर्माण होतात. मनामध्ये होणारी ही घुसमट कोणाला सांगायची? कोण एकून घेणार मला? गोपनीयतेसह मला कोण आधार देणार? अशा सारखे प्रश्न असणाऱ्या व्यक्तींसाठी संवाद हेल्पलाईन ही एक आधार बनते आहे.
मुक्ता फौंडेशन, पुणे या सामाजिक संस्थेने ११ नोव्हेंबर २०१३ पासून एचआयव्ही संसíगतांसाठी मोफत सेवा सुरू केली. ज्याला नाव देण्यात आले  ‘कॉल फ्री सíव्हस’ ९५२७६६५५६६ या नंबरवरती मिस्ड कॉल देणाऱ्या व्यक्तीस हेल्पलाईन स्वत: दूरध्वनी करून एच आय व्ही/एड्स, गुप्तरोग व टीबी या आजाराविषयी माहिती देते. ज्यामुळे माहिती घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीस ही माहिती मोफत मिळते. आतापर्यंत आठ महिन्यात ४ हजार ७७६ एवढे कॉलर सोबत हेल्पलाईनचे बोलणे झाले आहे. हेल्पलाईनकडे आलेल्या मिस्ड कॉलच्या संख्येचा विचार करिता संसíगत व्यक्ती सोबतच इतर व्यक्तीलाही या मोफत सेवेची गरज आहे म्हणून सध्या ही सेवा सर्वासाठी सुरू करण्यात आली आहे.
     संवाद हेल्पलाईनमार्फत आधारासोबतच गरजेप्रमाणे व्यक्तीला संदर्भ सेवा समुपदेशनाच्या माध्यमातून पुरविण्याचे काम केले जाते. एचआयव्ही नंतर काळजी, सुरक्षा, आहार, आरोग्य, लंगिकसंबंध, औषधोपचार, सकारात्मक जीवनशैली याविषयी सविस्तर शास्त्रीय माहिती तज्ञ समुपदेशकांच्या माध्यमातून देण्याचे काम केले जाते.
      एचआयव्ही नंतर जोडीदाराला स्वत:च्या आजाराविषयी कल्पना देणे, कुटुंबातील व्यक्तीची काळजी घेणे, स्वतची व कुटुंबातील व्यक्तीची सुरक्षिता याबरोबरीने असलेल्या अनेक गरसमजुती दूर करण्याविषयीची माहिती हेल्पलाईन वरून दिली जाते. कायदेविषयक मदत, मुला-मुलींसाठी आवश्यक निवासगृह, मोफत ओषधोपचार केंद्र, विवाहविषयक विविध संस्थांचे नाव व पत्ते असे संदर्भही पुरविले जातात. मोफत दूरध्वनी सेवेमुळे ती व्यक्ती समोर न येता, कोणतेही नाव, पत्ता न सांगतादेखील शास्त्रीय माहिती मोफत मिळवू शकते. हे सर्व संभाषण गोपनीय ठेवले जाते. एचआयव्ही तपासणीची गरज असणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून त्यांच्याकरिता ही हेल्पलाईन सेवा वरदायिनी ठरते आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा