पुणे महापालिका प्रशासकपदाचा कारभार विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सोपविण्यात आल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे. महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याने कुमार रुजू होईपर्यंत राव यांच्याकडे पदभार राहणार आहे. मात्र विक्रम कुमार यांची बदली होईल, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे :चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यास आणखी आठ दिवस विलंब? ; सेवावाहिन्या स्थलांतर रखडले

महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपुष्टात आल्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे प्रशासक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. प्रशासक पदाची सहा महिन्यांची मुदत बुधवारी संपुष्टात आली. त्यातच विक्रम कुमार वैद्यकीय कारणास्तव रजेवर आहेत. प्रशासक पदाची मुदत संपल्यानेच विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे महापालिकेची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते.आयुक्तांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त आयुक्तांकडे महापालिकेच्या कारभाराची जबाबदारी दिली जाते. या वेळी मात्र महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे जबाबदारी न देता ती सौरभ राव यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळेही आयुक्तांची बदली होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. कुमार वैद्यकीय रजेवरून परतेपर्यंतच राव यांच्याकडे जबाबदारी राहील, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saurabh rao is responsible for the post of municipal administrator pune print news amy