आणखी १९ शिक्षणसंस्थांचा समावेश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह आणखी १९ शिक्षण संस्थांना ‘श्रेष्ठता’ दर्जा देण्याची शिफारस उच्चाधिकार समितीने केंद्रीय अनुदान आयोगाकडे केली आहे. जुलैमध्ये तीन सरकारी आणि तीन खासगी शिक्षण संस्थांना श्रेष्ठता दर्जा (इन्स्टिटय़ूट ऑफ इमिनन्स) जाहीर झाला होता. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अजून अस्तित्वात न आलेल्या ‘रिलायन्स जीओ’ शिक्षण संस्थेला हा दर्जा मिळाल्यामुळे वाद निर्माण झाला होता.

समितीने शुक्रवारी दुसरा अहवाल यूजीसीकडे दिला असून आणखी १९ शिक्षण संस्थांना श्रेष्ठता दर्जा देण्याची शिफारस केली आहे. त्यापैकी १२ संस्था खासगी असून ७ संस्था सरकारी आहेत. सरकारी शिक्षण संस्थांमध्ये प्रामुख्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ यांचा समावेश आहे. खासगी संस्थांमध्ये अझीज प्रेमजी विद्यापीठ, अशोका विद्यापीठ, इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक हेल्थ सायन्सेस यांचा समावेश आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चाधिकार समितीला २० शिक्षण संस्थांची शिफारस करण्यास सांगितले होते. त्यापैकी पहिल्या यादीत आठ सरकारी शिक्षण संस्थांची तर तीन खासगी शिक्षण संस्थांची शिफारस करण्यात आली होती. त्यापैकी प्रत्येकी तीन संस्थांना श्रेष्ठता दर्जा देण्यात आला. उर्वरित पाच आणि नव्याने शिफारस केलेल्या सात अशा १२ सरकारी शिक्षण संस्थांचा विचार केला जाणार आहे. तर खासगी शिक्षण संस्थांपैकी नव्या शिफारस केलेल्या १२ संस्थाही विचाराधीन आहेत.

शिफारशींची नवी यादी

  • सरकारी शिक्षण संस्था- १) बनारस हिंदू विद्यापीठ (वाराणसी, उत्तर प्रदेश) २) तेजपूर विद्यापीठ (तेजपूर, आसाम) ३) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पुणे, महाराष्ट्र) ४) हैदराबाद विद्यापीठ (हैदराबाद, तेलंगणा) ५) अलिगढ मुस्लीम विद्यापीठ (अलिगढ, उत्तर प्रदेश) ६) पंजाब विद्यापीठ (पंजाब, चंदिगढ) ७) आंध्र विद्यापीठ (विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश)
  • खासगी शिक्षण संस्था- १) अमृता विश्व विद्यापीठम (कोईम्बतूर, तमिळनाडू) २) व्हीआयटी (वेळ्ळोर, तमिळनाडू) ३) जामिया हमदर्द विद्यापीठ (नवी दिल्ली) ४) शिव नादर विद्यापीठ (नोएडा, उत्तर प्रदेश) ५) अझीज प्रेमजी विद्यापीठ (बंगळूरु, कर्नाटक) ६) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ह्य़ुमन सेटलमेंट्स (बंगळूरु, कर्नाटक) ७) अशोका विद्यापीठ (सोनपत, हरयाणा) ८) ओ. पी. जिंदल ग्लोबल विद्यापीठ (हरयाणा) ९) सत्यभारती विद्यापीठ (हरयाणा) (प्रवर्तक-सत्यभारती फाऊंडेशन, नवी दिल्ली) १०) क्रीया विद्यापीठ (श्री सिटी, आंध्र प्रदेश) ११) कलिंगा इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रिअल टेक्नॉलॉजी (भुवनेश्वर, ओडिशा) १२) इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक हेल्थ सायन्सेस (तेलंगणा) (प्रवर्तक- पब्लिक हेल्थ फाऊंडेशन, नवी दिल्ली)

शिफारशींची पहिली यादी

सरकारी शिक्षण संस्था

१) आयआयटी मद्रास

२) आयआयटी खडकपूर

३) दिल्ली विद्यापीठ

४) जाधवपूर विद्यापीठ

५) अण्णा विद्यापीठ

श्रेष्ठता दर्जा मिळालेल्या संस्था

सरकारी शिक्षण संस्था

१) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स (बंगळूरु, कर्नाटक)

२) आयआयटी मुंबई</p>

३) आयआयटी दिल्ली

खासगी शिक्षण संस्था

१) बिट्स पिलानी (राजस्थान)

२) मणिपाल अ‍ॅकॅडमी हाय्यर एज्युकेशन

३) जीओ इन्स्टटय़ूट (रिलायन्स फाऊंडेशन, महाराष्ट्र)