लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी वेगाने होऊन निकाल लवकर जाहीर करण्यासाठी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. उत्तरपत्रिकांच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी येत्या काही गिवसांत निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून, पहिल्या टप्प्यात या प्रणालीचा वापर विद्यापीठ संकुलातील आणि संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी केला जाणार आहे.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
Education Institute Quality, Education Institute ,
अशा वातावरणात कशी वाढणार शिक्षणाची गुणवत्ता?
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
MPSC Preparation Group B Services Prelims Exam History of Modern India
एमपीएससी तयारी: गट ब सेवा पूर्व परीक्षा; आधुनिक भारताचा इतिहास
second phase, teacher recruitment,
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कधी? ऑनलाइन कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे आणि प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी ही माहिती दिली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे विस्कळीत झालेले शैक्षणिक वर्ष अजूनही सुरळीत झालेले नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासूनच अंमलबजावणी करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत. त्यासाठी शैक्षणिक वर्ष सुरळीत होणे, परीक्षा आणि निकाल प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन डिजिटल पद्धतीने करून निकाल जलदगतीने जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.

आणखी वाचा- पुणे: सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या दिनदर्शिकेत महावीर जयंतीला गौतम बुद्धांचे छायाचित्र

विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा ६ जूनपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. डिजिटल मूल्यांकनात परीक्षेनंतर संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकांची छायाप्रत तयार करून प्राध्यापकांच्या ऑनलाइन खात्यात पाठवण्यात येईल. प्राध्यापकांनी ती उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासल्यावर गुणांच्या नोंदी होतील.ही माहिती त्याचवेळी पुन्हा विद्यापीठाकडे परत येईल. अशा पद्धतीने इतर विषयांचे गुण आल्यानंतर लगेचच ऑनलाइन गुणपत्रिका प्रसिद्ध करता येईल. त्यानंतर विद्यापीठाकडून गुणपत्रिकांची छपाई करून विद्यार्थ्यांना दिली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शेवटच्या विषयाची परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांतच निकाल प्रसिद्ध करणे शक्य होईल, असे डॉ. काळे यांनी सांगितले. राज्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते. त्यामुळे विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षेचा कमी वेळात जाहीर होतो, असेही त्यांनी सांगितले.

ऑनलाइन पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणीचा यशस्वी प्रयोग विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाने केला आहे. तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्याने या प्रणालीचा व्यापक उपयोग आवश्यक आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलातील अभ्यासक्रम आणि संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रणाली वापरली जाईल. विद्यापीठ संकुलात साधारण चार हजार विद्यार्थी, तर संलग्न महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवीचे ६० हजार विद्यार्थी आहेत. पुढील टप्प्यात इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने मूल्यांकन करण्यात येईल. उत्तरपत्रिकांची गोपनीयता आणि सुरक्षिततेबाबत काळजी घेण्यात आली आहे, असे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या प्रणालीसाठी प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. -डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यामापन मंडळ

शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टपासून

शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत झाल्याचा परिणाम पुढील शैक्षणिक वर्षावर होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टपासून सुरू करण्यात येईल, असेही डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

Story img Loader