पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विस्कळीत झालेले शैक्षणिक वेळापत्रक, लांबलेल्या परीक्षा आणि त्याचे पुढील शैक्षणिक वर्षावर होणारे परिणाम या बाबत अधिसभेत गदारोळ झाला. परीक्षेच्या मुद्द्यावरून संतप्त अधिसभा सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत स्वतंत्रपणे चौकशी, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी समिती नियुक्त करण्याची घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. मात्र प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी या वेळी उपस्थित होते. कुलगुरूंनी अध्यक्षीय अहवाल सादर केल्यानंतर अधिसभा सदस्य विनायक आंबेकर यांनी परीक्षा, बिघडलेले शैक्षणिक वेळापत्रक, परीक्षा विभागातील कारभारावर आक्षेप घेतला. पहिल्या सत्राच्या परीक्षेचा निकाल एप्रिल-मेमध्ये जाहीर होणार, त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या परीक्षा होणार, तर पुढील शैक्षणिक वर्ष बिघडणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>>> पुणे : दलालाकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयातील निरीक्षकाला मारहाण

त्यानंतर अन्य सदस्यांनीही परीक्षा, वेळापत्रकातील बदल, निकालाबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच परीक्षा विभागाचा कारभाराची चौकशी, परीक्षांतील सुधारणांबाबत समितीची मागणी केली. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन कुलगुरूंनी डॉ. राजेंद्र विखे पाटील, प्रसेजनित फडणवीस, विनायक आंबेकर, ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. अपूर्व हिरे, राहुल पाखरे, प्रा. बाळासाहेब सागडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांची समिती नियुक्त करण्यात आली. दोन महिन्यांत ही समिती अहवाल सादर करेल, असे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savitribai phule pune university general assembly over delayed exams disrupted academic year pune print news ccp 14 ysh
Show comments