पुणे : पारंपरिक सिगारेटबरोबरच अनेक तरुणांकडून ई सिगरेटला पसंती दिली जाते. मात्र महाविद्यालयांच्या परिसरात ई सिगरेटला बंदी घालण्याचे निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले आहेत. तसेच ई सिगरेटला चाप लावण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवण्याची सूचनाही विद्यापीठाने दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अतिवृष्टीमुळे दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उद्याची परीक्षा लांबणीवर

केंद्र सरकारकडून ई सिगरेटचे उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहेत. त्यासाठी २०१९मध्ये अधिनियमही करण्यात आला आहे. मात्र  ऑनलाइन संकेतस्थळे, स्थानिक दुकानदारांकडे ई सिगरेट उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच ई सिगरेट महाविद्यालयांच्या परिसरात विकली जात असल्याने विद्यार्थी व्यसनांच्या जाळ्यात ओढले जातात. या पार्श्वभूमीवर ई सिगरेटचा वापर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालनलयाने विद्यापीठे, महाविद्यालयांना निर्देश दिले होते. त्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी परिपत्रक प्रसिद्ध करून महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांच्या परिसरात ई सिगरेटची विक्री आणि उपयोग होणार नाही या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savitribai phule pune university order to ban e cigarettes in college premises pune print news ccp14 zws