पुणे : नॅक मूल्यांकनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्ययावत न करणारी महाविद्यालये, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते. महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्थांनी १५ जानेवारीपर्यंत माहिती अद्ययावत न केल्यास शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील सर्व व्यावसायिक, बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिला आहे.

हेही वाचा >>> खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप! आरोग्य विभागाकडून राज्यभरात तपासणी मोहीम; जिल्हास्तरावर पथकांची नियुक्ती

State orders inspection of hospitals registered under Nursing Home Act
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप! आरोग्य विभागाकडून राज्यभरात तपासणी मोहीम; जिल्हास्तरावर पथकांची नियुक्ती
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Police Commissioner issues stern warning to goons Pune news
पोलीस आयुक्तांकडून गुंडांना कडक इशारा; ‘कायदा पाळा, अन्यथा शहर सोडून जा’
Father Two children dies after truck hits bike
पुणे : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय
no hmpv cases in maharashtra health department clarifies
राज्यात ‘एचएमपीव्ही’चा एकही रुग्ण नाही! आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण; दक्षतेच्या उपाययोजनांना सुरुवात
Pune Municipal Corporation will spend 300 crores to fulfill Prime Minister Narendra Modi's dream Pune print news
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिका करणार ३०० कोटी खर्च ?
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Police Bust Prostitution Racket At massage Parlour
स्वारगेट भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांकडून महिलेला अटक

विद्यापीठाच्या शैक्षणिक संलग्नता कक्षाच्या उपकुलसचिवांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. येत्या काही दिवसांत विद्यापीठाची नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया होणार आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठाने संलग्न महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्थांना नॅक मूल्यांकनाची माहिती अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ‘कॉलेज प्रोफाईल’मध्ये माहिती अद्ययावत न केल्यास शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६साठी संबंधित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्थांना मंजूर असलेल्या सर्व व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशास निर्बंध लागू करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, याची सर्व संबंधितांनी गंभीर दखल घ्यावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> राज्यात ‘एचएमपीव्ही’चा एकही रुग्ण नाही! आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण; दक्षतेच्या उपाययोजनांना सुरुवात

शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आणि प्राप्त आदेशान्वये विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था यांना कळविण्यात येते की, ज्या महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांनी नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन, मानांकनांबाबत प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा या बाबतची प्रारंभ टप्प्यातील संस्था नोंदणी नॅक कार्यालयास सादर केलेली नाही अशा किंवा कोणत्या टप्प्यावर आहे, या बाबतची माहिती अद्ययावत न केलेल्या महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्थांनी १५ जानेवारीपर्यंत माहिती अद्ययावत करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader