अभिजात संगीताच्या क्षेत्रात जगभरात नावाजलेला सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत मुकुंदनगर येथील शेठ दगडूराम कटारिया प्रशालेच्या मैदानावर होणार आहे.आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा यंदाचा ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आहे.

करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे हा महोत्सव होऊ शकला नाही. त्यामुळे यंदाच्या महोत्सवात स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी शुक्रवारी दिली. 

Story img Loader