पुणे: स्वरभास्कर भीमसेन जोशी यांचे आणि संगीतमार्तंड पं. पं. जसराज यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. तानसेन यांच्यानंतर शास्त्रीय संगीतावर कोणाचा दीर्घकाळ प्रभाव राहिला असेल तर तो निश्चितच भीमसेनजींचा आहे, असे वडील नेहमी म्हणत. सवाई गंधर्व महोत्सवावर त्यांचे नितांत प्रेम होते. महोत्सवातील सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी ते सदैव सजग असत, अशा शब्दांत पं. जसराज यांची कन्या आणि गायिका दुर्गा जसराज यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवांतर्गत आयोजित ’अंतरंग..एक अनोखी रसयात्रा’ कार्यक्रमात दुर्गा जसराज आणि पं. जसराज त्यांचे भाचे व शिष्य पं. रतन मोहन शर्मा यांच्याशी मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी संवाद साधला. पं. जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज, प्रसिद्ध गायक पं. सत्यशील देशपांडे, पं. रतन मोहन शर्मा यांचे पुत्र व गायक स्वर शर्मा या वेळी उपस्थित होते. दुर्गा जसराज म्हणाल्या,  पंडितजीसोबत प्रत्येकाचे वेगळे आणि आपुलकीचे नाते होते. इतर वेळी त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ असत. ते आपल्या शिष्यांना कधीच स्वतः च्या सुरानुसार शिकण्याचा आग्रह करत नसत. तर शिष्यांच्या सुरानुसार शिकवण्यावर त्यांचा अधिक भर असे.

हेही वाचा >>> पुणे: अभिजात संगीताच्या स्वरयज्ञास आजपासून सुरुवात; ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ची तयारी पूर्णत्वास

चित्रपती व्ही. शांताराम आणि पं. जसराज यांच्याविषयीचे किस्से सांगताना दुर्गा जसराज म्हणाल्या,  आठवणीबाबत दुर्गा म्हणाल्या, कोलकत्त्यात वास्तव्यास असताना वडिलांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. त्यावेळी ‘तुम्ही वसंत देसाई यांच्यासमवेत काम करून एखाद्या चित्रपटासाठी वसंत-जसराज नावाने संगीत दिग्दर्शन करा’, असे व्ही. शांताराम यांनी सुचविले होते. त्यावेळी वडिलांनी ही संधी नम्रपणे नाकारली. त्यांची संगीताप्रती असलेली निष्ठा पाहून आजोबांनी त्यांना ’तू खूप मोठा होशील’ असा आशीर्वाद दिला होता.  पुढे  पं. जसराज यांना एकदा मुंबईत एक मोठा कार्यक्रमासाठी विचारणा करताना संयोजकांनी व्ही. शांताराम यांना कार्यक्रमासाठी घेऊन यावे अशी अट टाकली होती. ‘व्ही शांताराम यांच्यामुळे पं जसराज मोठे झाले हे मला कधीही  ऐकायला आवडणार नाही’, असे सांगून व्ही. शांताराम यांनी नकार दिला होता.

हेही वाचा >>> मी राजीनामा देणार नाही, साहित्य संस्कृती मंडळाची काहीही चूक नाही – डॉ. सदानंद मोरे

शर्मा म्हणाले, मी गायक व्हावे अशी आईची इच्छा होती. त्यामुळे मी मामा पं. जसराज यांच्याकडे शिकलो. संगीताची तालीम देताना ते एक गोष्ट चारवेळा समजावून सांगत. पाचव्या वेळी जमले नाही तर त्यांच्यातील गुरू जागृत होत असे. नंतर माझा मुलगा त्यांच्याकडे शिकत होता. ‘मी त्याला शिकवत असलो तरी तू वडील म्हणून आमच्यामध्ये येऊ नको’, असे पंडितजींनी मला सांगितले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sawai gandharva festival jasraj love opinion of durga jasraj pune print news vvk 10 ysh