पिंपरी : स्वच्छतेची मोहीम राबवताना पर्यावरण संवर्धनालाही तितकेच महत्व दिले पाहिजे. झाडांइतके जगात कोणीही मोठे नाही. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा, असा संदेश प्रसिद्ध अभिनेते व पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी निगडीत बोलताना दिला. आपल्याकडे कचरा करणारे जास्त असून कचरा उचलणारे कमी आहेत, इथेच खरा घोळ आहे, अशी टिपणीही त्यांनी केली. पिंपरी पालिकेच्या वतीने शहरातील क्षेत्रीय कार्यालयांसह अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा प्रारंभ शिंदे यांच्या हस्ते दुर्गा देवी उद्यानात झाला, त्या वेळी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुणे : पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने लांबविले

शिंदे म्हणाले, ‘गरजेपेक्षा अधिक लोक शहरात वास्तव्य करत असल्यामुळे त्यातून समस्या देखील निर्माण होतात. कळते पण वळत नाही, अशी सध्या परिस्थिती आहे. काही लोक उघड्यावर कचरा फेकतात आणि दुसऱ्यांना उपदेश करतात. आधी स्वतः कृतिशील झाले पाहिजे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण करताना स्वच्छतेची चळवळ अधिक गतिमान केली पाहिजे’
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘नागरी सहभागाशिवाय कोणतीही मोहीम यशस्वी होत नाही. देशातील सर्वांत स्वच्छ शहराचा बहुमान मिळवण्यासाठी पिंपरी पालिका प्रयत्नशील आहे’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sayaji shinde environmental conservation given equal importance carrying cleanliness pimpri pune print news tmb 01