पुणे: मध्यरात्री सव्वाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा दूरध्वनी खणखणला. कुरकुंभमधील एसबीआय बँकेचे एटीएम चोर फोडत असल्याची माहिती कळविली. आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांनी सत्यता तपासल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने ग्रामीण पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधून दौंड पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदाराला कळविले. पोलिसांनीदेखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे समजताच चोरांनी तेथून पळ काढला आणि एटीएम फोडण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सतर्कतेमुळे चोरांचा एटीएम फोडून त्यातील रोकड लंपास करण्याचा डाव फसला.

दौंड तालुक्यातील कुरकुंभकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) एटीएम आहे. या एटीएममध्ये मध्यरात्री एक वाजून आठ मिनिटांनी चोरांनी चेहरा झाकून प्रवेश केला आणि एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा दुसऱ्या दिशेला फिरविला. ठाण्यातील एसबीआयच्या ई-सर्व्हिलन्स केंद्रातील कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी दौंड पोलीस ठाण्यातील लॅण्डलाइन क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, दौंड पोलीस ठाण्यातून दूरध्वनी उचलला गेला नाही. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर मध्यरात्री सव्वाच्या सुमारास संपर्क साधला. श्याम शेवते, अमर काळे आणि राहुल पोखरकर हे कर्मचारी रात्रपाळीत कर्तव्यावर होते. त्यांनी एसबीआयच्या कर्मचाऱ्यांकडून चित्रफितीच्या माध्यमातून खातरजमा करून घेतली.

scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
collector bro kerala ias officer n prashantha suspended
Kelara IAS Officer: ‘कलेक्टर ब्रो’ IAS अधिकारी निलंबित; वरीष्ठ अधिकाऱ्यावर जाहीररीत्या आगपाखड केल्यावरून कारवाई!
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!

हेही वाचा >>>साखर उद्योगाला मोठा दिलासा जाणून घ्या, इथेनॉल बाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधण्यात आला. ग्रामीण पोलिसांकडून दौंड पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांचा क्रमांक मिळवून त्यांना घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने बीट मार्शलना घटनास्थळावर रवाना केले. तसेच दौंड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड हे देखील सहकाऱ्यांनिशी घटनास्थळी तीन मिनिटांत पोहोचले. पोलीस आल्याचे पाहून चोरांनी अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळ काढला.पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने चोरांना एटीएम फोडता आले नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातील शेवते, काळे या दोन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दौंडमधील चोरीची घटना टळली.

हेही वाचा >>>पिंपरी- चिंचवड: गणपती मंडळांनी बळजबरी वर्गणी मागितल्यास होणार कडक कारवाई; पोलीस आयुक्त चौबे यांचा इशारा

पुणे-सोलापूर महामार्गावरून कुरकुंभकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील एसबीआयचे एटीएम चोर फोडत असल्याची खबर मध्यरात्री मिळाली. माहिती मिळाल्यानंतर केवळ तीन-चार मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अंधाराचा फायदा घेऊन चोर पसार झाले. मात्र, चोरांना एटीएम फोडता आले नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.- तुकाराम राठोड, सहायक पोलीस निरीक्षक, दौंड पोलीस ठाणे