अंधश्रद्धा निर्मुलन समितीने २०१२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमधून लाखो रुपयांचे उत्पन्न लपवून घोटाळा केल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट आणि विरेंद्र इचलकरंजी यांनी केला आहे.
यावेळी ह.भ.प.नवनाथ महाराज शिंदे, मोहन डोंगरे, ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे आणि विजय गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी सुनील घनवट म्हणाले की, अंनिस च्या दिवाळी अंकाच्या घोटाळ्या बाबत धर्मादाय आयुक्त आणि आयकर खात्याकडे देखील तक्रार केली असून त्या तक्रारी ची त्यांनी दखल घेतली आहे.या बाबत कारवाई सुरू आहे.
या घोटाळ्यातून मिळालेला हा काळा पैसा आहे.तो कोणाच्या खिशात गेला आणि त्याचा वापर कशासाठी झाला. तसेच अंनिसने स्वतःचे आर्थिक ताळेबंद आणि कामकाजातील बदल हे शासन दरबारी वेळेत दाखल केलेले नाहीत. या सर्वांचा खुलासा अंनिसचे हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर आणि अविनाश पाटील यांनी करावा.अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.