गेल्या काही वर्षांतील िपपरी पालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळेच ‘स्मार्ट सिटी’सारख्या चांगल्या योजनेतून िपपरी-चिंचवडला बाहेर पडावे लागले, अशी टीका भाजपचे खासदार अमर साबळे यांनी िपपरीत पत्रकार परिषदेत बोलताना केली.
केंद्र सरकारच्या भगिनी सुरक्षितता अभियानाअंतर्गत शहरातील ७५ हजार गरजू महिलांना विम्याचे संरक्षण देण्यात येणार असून तसे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी प्राधिकरणातील पाटीदार भवनात याचा प्रारंभ होणार आहे, अशी माहिती साबळे यांनी दिली. आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष सदाशिव खाडे आदी उपस्थित होते.
या वेळी ‘स्मार्ट सिटी’ विषयी साबळे म्हणाले, िपपरीचा समावेश होणार नाही, याची पूर्वकल्पना होती. िपपरी पालिकेतील भ्रष्ट कारभाराच्या तक्रारी वपर्यंत गेल्या आहेत. ‘जेएनयूआरएम’चा जो निधी िपपरी पालिकेला मिळाला, त्यात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांकडूनही तसे अहवाल देण्यात आले होते. हीच कारणे स्मार्ट सिटीच्या समावेशासाठी अडचणीची ठरली. आम्ही िपपरीवर अन्याय होऊ देणार नाही, त्यासाठी केंद्रात व राज्यात पाठपुरावा करू. जगताप म्हणाले,‘या भागातून एकच शहर निवडण्यात येणार होते. यात काहीही राजकारण नाही. अद्याप दोन शहरांची निवड बाकी आहे, त्यात प्रवेश मिळवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तसेच केंद्रीय नगरविकासमंत्र्यांकडे दाद मागणार आहोत.’

Story img Loader