लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे: राज्याच्या पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) पाठ्यवृत्ती जाहीर केली आहे. त्याकरिता १५ मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पाठ्यवृत्तीसाठी प्रवेश परीक्षा होणार असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा ४० हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाणार आहे. तसेच पाठ्यवृत्ती पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
नवीन दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. या पाठ्यवृत्तीसाठी २१ ते २६ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींना अर्ज करता येणार आहे. कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारकांना अर्ज करता येणार आहे. तसेच पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाव्यवस्थापक, मफतलाल हाऊस, एस. टी. पारीख मार्ग, १६९ बॅकबे रिक्लेमेशन्स, चर्चगेट, मुंबई या पत्त्यावर अर्ज करावा लागणार आहे, अशी माहिती एमटीडीसी पुणेच्या प्रादेशिक व्यवस्थापक मौसमी कोसे यांनी दिली.
आणखी वाचा-पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची महापालिकेकडून अंमलबजावणी
दरम्यान, अर्ज केलेल्या उमेदवारांची २५ मे रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर होऊन मुलाखती पार पडतील. त्यानंतर निवड झालेले उमेदवार रुजू करून घेतले जाणार आहेत. पाठ्यवृत्ती काळात टूर पॅकेज, क्रिएशन-डिझाइन इन टुरिझम, डिजिटल-सोशल मीडिया इन टुरिझम, मार्केटिंग, रिसॉर्ट ऑपरेशन, रेस्टॉरंट ऑपरेशन, लॅण्ड मॅनेजमेंट, कॉर्पोरेट अकौंटिंग, टुरिझम इंजिनिअरिंग आदी विषयांवर कामाचा अनुभव मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी gm@maharashtratourism.gov.in आणि dgm@maharashtratourism.gov.in या संकेतस्थळांवर ऑनलाइन अर्ज पाठवावेत, असेही कोसे यांनी सांगितले.